PHOTOS

Indian Railway ची रामायण यात्रा! नेपाळ ते रामेश्वरमचा टप्पा, 17 दिवसांच्या प्रवासासाठी किती खर्च?

IRCTC Shri Ramayana Yatra 2025: श्रीराम भक्तांसाठी भारतीय रेल्वेची खास टूर. IRCTC नं लाँच केला ट्रॅवल प्लॅन. प्रभू श्रीरामाशी संबंधित अनेक ठिकाणी भेट देण्याची मिळणार संधी..

Advertisement
1/8
प्रभू श्रीराम
प्रभू श्रीराम

IRCTC Shri Ramayana Yatra 2025: अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची स्थापना आणि त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्या क्षणापासून भाविकांनी या मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी रिघ लावली. 

 

2/8
IRCTC
IRCTC

अयोध्यानगरीला एक वेगळंच रुप प्राप्त झालं. अशा या रामभक्तांसाठी आता भारतीय रेल्वे आणि IRCTC पुढे सरसावली असून, एका खास यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामाध्यमातून श्रीराम यांच्याशी संबंधित बहुतांश धार्मिक स्थळांवर भाविकांना नेण्यात येणार आहे. 25 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीकडून "भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन"च्या माध्यमातून 'श्रीरामायण यात्रा'च्या प्रवासाची सुरुवात होईल. दिल्लीतील सफदरजंग इथून ही ट्रेन रवाना होईल. 

3/8
कोणत्या ठिकाणांना देणार भेट?
कोणत्या ठिकाणांना देणार भेट?

या संपूर्ण यात्रेमध्ये प्रवासी 7600 किमी इतका प्रवास करणार असून, त्यामध्ये अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर (नेपाळ), बक्सर, वाराणासी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम अशा ठिकाणांना भेट देता येणार आहे. अयोध्येमध्ये यात्रेकरुंना श्रीराम जन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, शरयू घाटावर जाता येईल. 

 

4/8
प्रवास
प्रवास

पुढे नंदिग्राम इथं भरत मंदिर, सीतामढी, जनकपूर इथं माता सीता जन्मस्थळ आणि राम जानकी मंदिरही पाहता येणार आहे. बक्सर इथं रामरेखा घाट आणि रमेश्वरनाथ मंदिराच्या दर्शनासमवेत वाराणासी इथं काळी विश्वनाथ मंदिर, तुळशी मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर आणि गंगा आरती यात्रेकरुंना अनुभवता येईल. यात्रेच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रयागराज, श्रृंगवेरपूर, चित्रकूटचा दौरा, रस्तेमार्गानं होणारा प्रवास आणि रात्रीच्या मुक्कामाचा समावेश असेल. 

5/8
नाशिकपर्यंत दौरा
नाशिकपर्यंत दौरा

नाशिकपर्यंत हा  दौरा आल्यानंतर तिथं त्र्यंबकेश्वर, पंचवटी, पुढे हम्पीमध्ये किष्कींधा नगरी, अंजनेय पर्वत, विठ्ठल आणि विरुपाक्ष मंदिरांना भेट दिली जाईल. अखेरच्या टप्प्यात हा प्रवास रामेश्वरम इथं पोहोचणार असून तिथं रामनाथस्वामी मंदिर, धनुष्कोडी इथं जाऊन 17 व्या दिवशी ही ट्रेन यात्रेकरुंना दिल्लीला सोडेल. 

 

6/8
प्रवासादरम्यान कोणत्या सुविधा मिळणार?
प्रवासादरम्यान कोणत्या सुविधा मिळणार?

भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेनमध्ये 150 यात्रेरुंची क्षमता असून, यामध्ये AC First, Second आणि Third Class एसीचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये दोन मॉडर्न रेस्तराँ, हायटेक किचन, बायो टॉयलेट्स, शॉवर क्यूबिकल्स, सेंसर बेस्ड वॉशरुम, फूट मसाजर, सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक कोचमध्ये सुरक्षारक्षक अशा सुविधा असतील. दिल्लीशिवाय ही ट्रेन गाझियाबाद, अलिगढ, टुंडला, इटावा, कानपूर, लखनऊ इथं थांबेल. 

 

7/8
खर्चाचं गणित कसं असेल?
खर्चाचं गणित कसं असेल?

3AC क्लाससाठी या प्रवासात माणसी  ₹1,17,975/-, 2AC साठी माणसी ₹1,40,120/-, 1AC केबिनसाठी माणसी ₹1,66,380/- इतका खर्च येईल. या खर्चामध्ये रेल्वे प्रवास, 3 स्टार हॉटेलातील मुक्काम, सर्व ठिकाणी शाकाहारी भोजन, एसी कोचमधून फिरस्ती आणि तीर्थक्षेत्रांना भेट, प्रवास विमा, टूर मॅनेजर अशा खर्चांचा समावेश आहे. 

 

8/8
आरक्षणासाठी...
आरक्षणासाठी...

आय़आरसीटीसीच्या या महत्त्वाकांक्षी रामायण यात्रेसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर तिकीट आरक्षण केलं जाईल. यासाठी इच्छुकांनी www.irctctourism.com/bharatgaurav या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर माहितीसाठी इच्छुकांना 8595931047, 8287930299, 8882826357, 8287930032 आणि 8287930484 या क्रमांकांवरही संपर्क साधता येईल. 





Read More