बॉलिवूड अभिनेता इरफान खान म्हणतो की, त्याची पत्नी सुतापा सिकंदर त्याची सर्वात चांगली मैत्रिण आहे. सुतापाने करीब करीब सिंगल या त्याच्या चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
इरफानने सांगितले की, सुतापा माझी सर्वात चांगली मैत्रिण असून आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करतो.
आम्ही एकाच शाळेत शिकलोय आणि माझ्या तुलनेत तिला सर्व गोष्टींची समज अधिक आहे. तिच्याकडे सकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा करीब करीब सिंगल या चित्रपटात अत्यंत सुंदररीत्या दाखवण्यात आली आहे.
तनुजा चंद्रा द्वारा दिग्दर्शित चित्रपटात पार्वती प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला टी.व्ही. वर प्रसारीत होईल.
ही विपरीत व्यक्तिमत्व असलेल्या दोन व्यक्तींची कहाणी आहे. जे डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटतात. प्रेम कुठेही भेटू शकतं, असे इरफानचे म्हणणे आहे. (इनपुट IANS)