Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
शनिदेव आणि यमराज यांची भल्याभल्याला भीती वाटते. भारतात एक असं मंदिर आहे जिथे यमराज विराजमान आहेत. मानवाच्या मृत्यूनंतर या न्यायालयात त्या व्यक्तीला स्वर्गाचे दार की नर्क यातना सहन करायची आहे हे ठरतं.
या मंदिरात लोक दर्शनासाठी जायला घाबरतात. भारतातील हे अनोखं मंदिर अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. या मंदिराबद्दलच्या आख्यायिकेमध्ये असं सांगण्यात आलं की, मृत्यूनंतर आत्मा पहिले या मंदिरात येते.
यमराजाचं हे अद्भूत आणि रहस्यमय मंदिर हिमाचलमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर इथं वसलेलं आहे. जगातील हे एकमेव मंदिर आहे.
अगदी लहान आणि घरासारखं दिसणार हे मंदिर उंच पर्वतांच्या मधोमध वसलेलंय. धर्मराज अशीही या मंदिराची ओळख आहे. हे मंदिर कोणी आणि कधी बांधलं याबद्दल काही माहिती नाही.
पण इतिहासात असा उल्लेख आहे की, सहाव्या शतकात चंबाच्या राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केलं होतं. या मंदिराला तांबे, लोखंड, सोनं आणि चांदीचे चार दरवाजे तुम्हाला पाहिला मिळतात.
या मंदिरात आत्मा आल्यानंतर भगवान चित्रगुप्त त्याच्या कर्माच तपशील पाहतो आणि स्वर्ग किंवा नर्क ठरतो. त्यानंतर यमराज त्या आत्माला सोबत घेऊन जातो.
त्यामुळे या मंदिरात जाण्यापासून लोक घाबरतात आणि मंदिराच्या बाहेरूनच हात जोडतात. तर या मंदिरात एक खोली आहे जी चित्रगुप्ताची असल्याचं म्हटलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)