अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान स्टारर सिनेमा मोहब्बते मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री किम शर्मा सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती एका फॅशन शो मध्ये झळकली होती. तिच्या रुपात फार फरक झालेल्या पाहुन तिने प्लॉस्टिक सर्जरी केल्याचे बोलले जात आहे.
फॅशन डिझायनर नंदिता महतानीच्या फॅशन शो मध्ये विशेष पाहुणे म्हणून किम शर्मानी हजेरी लावली. तिच्या जॉ लाईन आणि चेहऱ्यावरील उजळपणामुळे प्लॉस्टिक सर्जरी केल्याचे बोलले जात आहे.
पती अली पुंजानीसोबत वेगळे झाल्यानंतर तिने पहिल्यांदाच कोणत्यातरी कार्यक्रमात उपस्थिती लावली. २०१० मध्ये ती अली पुंजानीसोबत विवाह करुन केनियाला रवाना झाली. काही दिवसांपूर्वी ती मुंबईत परतली आहे. तिच्या मदतीसाठी जावेद जाफरी धाव घेतली आहे.
अलिकडेच राजस्थानच्या एका व्यक्तीने बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. मुंबई पोलिसात त्याने किम विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्या व्यक्तीच्या करोडोंच्या कारवर कब्जा केल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. राजस्थानच्या या व्यक्तीचे नाव दिलीप कुमार आहे.
किम शर्माने मोहब्बते सिनेमातून आपल्या करीअरला सुरुवात केली. सिनेमात जुगल हंसराज आणि तिची जोडी पाहायला मिळाली. त्याशिवाय टॉम डिक और हॅरी, मनी है तो हनी है आणि नहले पे दहला यांसारख्या सिनेमात तिने काम केले. मात्र तिचे बॉलिवूडमधील करिअर फारसे खास नव्हते.
मात्र आता जवळपास १८ वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो सौजन्य- @kimsharmaofficial)