River Which Flow Opposite in India: नदी हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातील नद्या या खासकरून आपल्याला फार आकर्षित करतात. परंतु तुम्हाला माहितीये का की अशी ही नदीही आहे जी विरूद्ध दिशेला वाहते.
भारतात नद्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यातून त्यांची पूजाही केली जाते आणि या नद्यांना धार्मिक महत्त्वही आहे. तेव्हा सध्या आपण अशाच एका नदीबद्दल जाणून घेऊया.
जी विरुद्ध दिशेने वाहते. त्याचबरोबर त्यामुळे तुम्हाला या नदीची नक्की भौगोलिक रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नद्या या हिमालयातून उगम पावतात आणि त्यानंतर दक्षिणेकडे वाहू लागतात.
या नदीचे नावं आहे नर्मदा. रिफ्ट वॅलीमुळे ही नदी विरूद्ध दिशेला वाहते. म्हणजेच या दिशेला उतार असल्या कारणानं ही नदी पुर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
यामागे एक रंजक कथाही सांगितली जाते. असं म्हणतात की नर्मदाचं लग्न हे सोनभद्रेशी ठरलं होतं. परंतु नर्मदेच्या मैत्रीणीमुळे ते वेगळे झाले.
तेव्हा नर्मेदेनं आजन्म कुमारी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिनं उताराच्या विरूद्ध दिशेने जाण्याचा निर्णय घेते.