How To Clean Tadka Ladle: फोडणीचे पात्र कालांतराने काळे पडू लागते आणि धुतल्यानंतरही ते स्वच्छ दिसत नाही. अशा वेळी या ट्रिकचा वापर करून तुम्ही फोडणी पात्रे तसेच इतर भांडी देखील सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. फक्त चार स्टेप्समध्ये, तुमचे भांडे पुन्हा नव्यासारखे चमकू लागेल.
फोडणी पात्र किंवा इतर भांडी कोमट पाण्याखाली धूवावे. यामुळे अन्नाचे कण आणि घाण बाहेर पडेल. लिक्विड डिश वॉशर किंवा साबणाच्या मदतीने स्पंज किंवा मायक्रोफायबर कापड वापरून पात्र स्वच्छ करा.
काळे डाग आणि चिकटपणासाठी व्हिनेगर आणि बेकींग सोड्याचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर एक समान प्रमाणात मिसळा. त्या मिश्रणात फोडणी पात्र 15 ते 20 मिनिटे भिजवून ठेवा. व्हिनेगरमधील घटक चिकटपणा आणि घाण दूर करतात. नंतर बेकींग सोड्याचा वापर करून स्पंजने चांगले घासून काढा. यामुळे सर्व डाग आणि चिकटपणा निघून जातो.
जर काळपट डाग अजूनही दिसत असतील तर जाड मीठ वापरा. जाड मीठ आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्पंज किंवा कपड्याने जळालेल्या ठिकाणी घासून काढा. मीठाच्या नैसर्गिक खरखरीतपणामुळे काळपट डागही आरामात निघतात. घासल्यानंतर गरम पाण्याने एकदा पुन्हा धुवा.
जर फोडणी पात्र स्वच्छ करुनही पिवळट डाग शिल्लक असतील, तर लिंबाचा वापर करावा. लिंबाचे दोन भाग करुन घ्यावे आणि त्यावर मीठ लावून डाग असलेल्या भागावर घासून घ्या. लिंबू आणि मीठ पिवळे डाग साफ करण्यात मदत करते.
अशा पद्धतीने फोडणी पात्र स्वच्छ केल्याने त्यातील डाग, दुर्गंधी आणि चिकटपणा निघून जातो आणि ते पुन्हा नव्यासारखे चमकू लागते. तुम्ही फोडणी पात्राच्या बरोबरच इतर भांडी सुद्धा या पद्धतीने स्वच्छ करू शकता, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व भांडी चमकदार दिसतील.
1. स्वच्छता करण्यासाठी खूप जास्त केमिकल्सचा वापर करू नका, त्याचे घटक भांड्यांवर राहीले तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. व्हिनेगर, मीठ आणि लिंबू ही नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहेत. 2. एक चांगली स्वच्छता केल्यावर भांडी ताजे राहण्यासाठी कधीही ते ओले ठेवू नका, त्यांना नेहमी वाळवून ठेवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)