ईशा अंबानीचा मेट गाला 2025 मधील लुक सध्या खूपच चर्चेत आला आहे. तिने परिधान केलेल्या 136 कॅरेट नेकलेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या.
मेट गाला 2025 मध्ये शाहरुख खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्या व्यतिरिक्त ईशा अंबानीने देखील हजेरी लावली होती. यामधील तिचा लूक सध्या चर्चेत आला आहे.
ईशाने या वेळी गळ्यात घातलेल्या शाही नेकलेसची सर्वात जास्त चर्चा होत आहे. तिने परिधान केलेला हा नेकलेस तिच्या आईचा असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
मेट गालामध्ये ईशा अंबानीने टेलर्ड फॉर यू या थीमवर लूक केला होता. या लुकमध्ये ईशा ही एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. तिचा हा ड्रेस अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला आहे.
ईशाने काळ्या रंगाच्या बेलबॉटम पँटसह हॉल्टर स्टाईल टॉप वेअर परिधान केला आहे. त्यासोबतच तिने एका लांब श्रग जॅकेटनं तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
ईशाच्या या नेकलेसने सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा नेकलेस Cartier Toussaint Necklace पासून इंस्पायर्ड आहे.
ईशाने परिधान केलेला हा नेकलेस 136 कॅरेटचा आहे. रिपोर्टनुसार हा नेकलेस राजा नवनगर यांनी बनवला होता.
सध्या सोशल मीडियावर ईशा अंबानीचे मेट गालामधील फोटो खूप व्हायरल होत आहेत. ती या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.