PHOTOS

इस्रायल युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम? शेअर मार्केट, सोने, पेट्रोल 'भडकणार'? जाणून घ्या

Israel War affect the common man: इस्त्रायल युद्धाचा नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतातील सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Advertisement
1/8
इस्रायल युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम? शेअर मार्केट, सोने, पेट्रोल 'भडकणार'? जाणून घ्या
इस्रायल युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम? शेअर मार्केट, सोने, पेट्रोल 'भडकणार'? जाणून घ्या

Israel War affect the common man: रशिया-युक्रेन युद्धातून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अद्याप नीट सावरल्या नव्हत्या आणि आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा परिणाम दीर्घकाळात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतातील सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

2/8
सणासुदीच्या काळात सोने महागण्याची शक्यता
सणासुदीच्या काळात सोने महागण्याची शक्यता

या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसणार आहे. भारतात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळी, भाऊबीज असे सण काही दिवसांवर येऊन ठेवले आहेत. अशावेळी लोक मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करतात. अशा परिस्थितीत या युद्धाचा परिणाम दिसल्यास दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.

3/8
ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशनची माहिती
ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशनची माहिती

सोन्याचा प्रीमियम 700 रुपयांवरून 2000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, पूर्वी ते 1300 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. याशिवाय, जर आपण चांदीचा प्रीमियम प्रति किलो 1000 रुपये वरून 3500 रुपये प्रति किलो झाले आहे. तर, पूर्वी ते 2500 रुपये प्रति किलो होते, अशी माहिती नोएडा ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस सुशील कुमार जैन यांनी दिली.

4/8
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही परिणाम
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही परिणाम

हमासच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, इस्रायलचा भारतासोबतचा व्यापार 10 अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, इस्रायलची निर्यात $8.5 अब्ज आणि आयात $2.3 अब्ज आहे.

5/8
उत्पादनाच्या किमती वाढतील
उत्पादनाच्या किमती वाढतील

याशिवाय हे युद्ध आशियाभर पसरले तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम दिसून येईल. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक शुल्कात वाढ आणि महागाई देखील दिसू शकते. मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे उत्पादनाच्या किमती आपोआप वाढतील.

6/8
शेअर मार्केटवर परिणाम
शेअर मार्केटवर परिणाम

दरम्यान, देशांतर्गत बाजार घसरले आहेत. आज 9 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स 500.47 अंकांच्या किंवा 0.76 टक्क्यांच्या घसरणीसह 65,495.16 च्या पातळीवर आहे. याशिवाय, निफ्टी 142.00 अंक किंवा 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 19,511.50 च्या पातळीवर आहे.

7/8
कंपन्यांच्या शेअर्समध्ये अल्ट्रा बायिंग
कंपन्यांच्या शेअर्समध्ये अल्ट्रा बायिंग

आज घसरणाऱ्या समभागांच्या यादीत टाटा स्टील, एनटीपीसी, एसबीआय, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, अॅक्सिस बँक, एलटी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, मारुती, केमिकल, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स, सन फार्मा, टेक महिंद्रा, विप्रो आणि नेस्ले यासह अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये अल्ट्रा बायिंग होत आहे.

8/8
700 हून अधिक इस्रायली सैनिक मारले गेले
700 हून अधिक इस्रायली सैनिक मारले गेले

इस्त्रायलवरील सर्वात प्राणघातक हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सैनिकांसह किमान 700 इस्रायली ठार झाले आहेत. याशिवाय 1900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी, प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात 450 हून अधिक मृत्यू झाले आहेत.

 





Read More