Akshaya Tritiya 2024 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येते. यंदा ही तिथी 10 मे 2024 शुक्रवारी आहे. यादिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी शुभ कार्य करण्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते. अक्षय्य तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी केल्यास घरात धनसंपदासह समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. पण तुम्हाला तुम्ही सोनं चांदी खरेदी करु शकत नसाल तर 'या' 6 गोष्टी खरेदी करु शकता.
अक्षय्य तृतीयेला तुम्ही कापूस खरेदी करु शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला महागडी वस्तू खरेदी करु शकत नसला तर कापूस खरेदीही शुभ मानली जाते.
अक्षय्य तृतीयेला तुम्ही कापूसऐवजी रॉक साल्ट करु शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रॉक साल्टचा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा तर चंद्र मानसिक शांतीचा कारक मानला जातो. रॉक साल्ट खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे.
अक्षय्य तृतीयाला तुम्ही मातीचे भांडेही खरेदी करु शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडी खरेदी केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते.
याशिवाय तुम्ही अक्षय्य तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोनं चांदी एवढा मान हा जव किंवा पिवळ्या मोहरीला आहे. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा बरसते.
या दिवशी तुम्ही तांबे किंवा पितळाची भांडीदेखील खरेदी करु शकता. त्यामुळे घरात धन धान्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे.
अक्षय्य तृतीयाला कवडी खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते. यादिवशी कवडी लक्ष्मीमातेच्या चरणी ठेवल्यास घरात कधीही धनाची कमी होत नाही अशी मान्यता आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)