Shahrukh Khan Hit Jackpot: अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार असल्याची बातमी समोर आलेली असताना आता खान कुटुंबासाठी अजून एक गोड बातमीचे संकेत मिळत आहेत. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात...
अभिनेता शहारुख खाननसाठी मागील 15 दिवसांमध्ये संपत्तीसंदर्भात दुसरी गुड न्यूज समोर आली आहे. आधीच सरकाकडून 9 कोटी रुपये मिळणार असतानाच आता शाहरुख आणि गौरीला अजून एक मोठी लॉटरी लागल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेता शाहरुख खानने 'मन्नत' बंगल्यासंदर्भातील जमिनीच्या व्यवहारासाठी भरलेले अतिरिक्त 9 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार परत करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता बॉलिवूडच्या किंग खानला अजून एक लॉटरी लागल्यासारखी बातमी समोर आली आहे.
मुंबईतील सर्वात महागड्या प्रॉपर्टी असलेल्या परिसरापैकी एक असणाऱ्या कार्टर रोडवरील श्री अमृत सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीमध्ये शाहरुख खानचा एक फ्लॅट आहे. याच इमारतीचा आता पुनर्विकास होणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे इथेही शाहरुखला मोठा फायदा होणार आहे. हा फायदा नेमका काय ते पाहूयात...
रिअल इस्टेट क्षेत्रातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा श्री अमृत सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीमध्ये एक टेरेस फ्लॅट आहे. या सोसायटीने जारी केलेल्या टेंडरच्या कागदपत्रांच्या हवाल्याने 'हिंदुस्तान टाइम्स'ने इमारत पुनर्विकासासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सोसायटीने जुलै 2024 मध्ये त्यांच्याकडे 4 हजार स्वेअऱ मिटर्सचा प्लॉट आहे. यामध्ये एकूण तीन इमारती असून एकूण एरिया 45 हजार स्वेअर फूट इतका आहे. महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट्स (रेग्युलेशन ऑफ द प्रमोशन कंट्रक्शन, सेल्स, मॅनेजमेंट आणि ट्रान्सफर) कायदा 1963 नुसार हा कार्पेट एरिया असल्याचं सोसायटीने म्हटलं आहे.
श्री अमृत सहकारी गृहनिर्माण संस्थेची सध्याची इमारत ही 1980 मध्ये लिजवरील जमीनीवर ही इमारत उभारण्यात आली होती. आता या सोसायटीमधील सदस्य वेगवेगळ्या विकासांबरोबर इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भातील चर्चा करत असल्याची माहिती सुत्रांच्या हव्याने हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.
"कार्टर रोडवर असलेल्या अगदी मोजक्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश होतो ज्यामधून समुद्र दिसतो. सध्या सोसायटीमधील सदस्यांच्या घरांच्या दुप्पट एरिया त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांना 110 ते 120 टक्के अतिरिक्त कार्पेट एरिया देण्याच्या ऑफरही आल्या आहेत," असं सोसायटीबरोबर पुनर्विकासासाठी चर्चा केलेल्या एका विकासकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
काही विकासकांच्या मते सध्या कार्टर रोडवरील प्रॉपर्टीच्या दरांचा विचार केला तर येथील समुद्राजवळच्या प्रॉपर्टीसाठी सध्या एका स्वेअर फुटाचा दर 1 लाख रुपये इतका आहे. मात्र हे दर 1 लाख 30 हजार प्रति स्वेअर फुटांपर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमधील सदस्यांबरोबरच शाहरुखलाही याचा फायदाच होणार आहे.
म्हणजेच खरोखर श्री अमृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुर्विकास झाला तर शाहरुख खान आणि गौरी खानच्या मालकीच्या फ्लॅटच्या मोबदल्यात त्यांना दुप्पट आकाराचा मोठा फ्लॅट मिळेल. शाहरुखला दोन आठवड्यात लागलेली ही दुसरी लॉटरी असल्याचं म्हणता येईल. प्रसिद्ध मुलाखतकार सिमी गरेवाल यांच्या युट्यूब चॅनेलवरील एका जुन्या व्हिडीओत शाहरुखच्या या घराची झलक पाहायला मिळते. वरील फोटो त्याच व्हिडीओवरुन घेण्यात आला आहे.
शाहरुखने 'मन्नत' हा बंगला विकत घेण्याआधी तो कार्टर रोडवरील याच इमारतीच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होता असं सांगितलं जातं. शाहरुख आणि गौरीने लग्नानंतर येथे काही वर्ष संसार केला. शाहरुखने 2001 साली मन्नत बंगला 13 कोटींना विकत घेतला होता.
सध्या शाहरुख आपल्या कुटुंबासहीत याच 'मन्नत' बंगल्यात राहतो. हा बंगला वांद्रे येथे असून या बंगल्याच्या एकूण एरिया 27 हजार स्वेअर फुटांहून अधिक आहे. या बंगल्याची सध्याच्या घडीला किंमत 350 कोटी रुपये इतकी आहे.