जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आज आम्ही तुम्हा एक भन्नाट ट्रेन प्रवासाबद्दल सांगणार आहोत. भारतातील कानाकोपऱ्यात 15 दिवसांमध्ये तुम्ही 8000 किमी अंतर फिरू शकता तेही फक्त 25 रुपयामध्ये. काय आहे या ट्रेनचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात.
प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. त्यात भारत हा निसर्गाने नटलेला असून ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांने समृद्ध असा देश आहे. तुम्हालाही फिरण्याची आवड असेल आणि तुम्ही तरुण असणार हा आज आम्ही तुम्हाला एका खास ट्रेनबद्दल सांगणार आहोत.
ही ट्रेन जागृती यात्रा या नावाने ओळखली जाते आणि तिची सुरुवात 2008 मध्ये करण्यात आली होती. या ट्रेन विषय खूप कमी लोकांना माहिती आहे. या ट्रेनचे ध्येय "उद्योगाद्वारे भारताची निर्मिती" असा आहे. या ट्रेनमधून प्रवास करून, तरुण उद्योजक होण्याचे गुण शिकू शकतात. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आम्ही तुम्हाला या ट्रेनमध्ये कसे प्रवास करू शकता, बुकिंग कसे केले जाईल सगळ्याबद्दल अपडेट करणार आहोत.
तुम्हाला जर या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर हे जाणून घ्या की, ही ट्रेन वर्षांतून एकदाच धावते. या ट्रेनमधून एकाच वेळी 500 लोक प्रवास करु शकता. यामध्ये, तरुणांना उद्योजकतेशी संबंधित बारकाव्यांबद्दल जाणीव करून दिली जाते. या प्रवासादरम्यान, प्रवाशाला 15 दिवस ट्रेनमध्येच व्यतित करावे लागतात.
ही जागृती यात्रा ट्रेन दिल्लीतून सुटते आणि तिचा पहिला थांबा अहमदाबाद असतो. यानंतर ती पुढे मुंबई आणि बेंगळुरू मार्गे मदुराईला पोहोचते. यानंतर, ती ओडिशाहून मध्य भारतात प्रवेश करते आणि पुन्हा दिल्लीला परते. या प्रवासादरम्यान, लोकांना अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना नेण्यात येतं.
ही ट्रेन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात धावते. पण यासाठी तुम्हाला आतापासून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. 2025 मध्ये, हा प्रवास 7 नोव्हेंबरपासून सुरू 22 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचे भाडे इतर ट्रेनच्या तुलनेत खूपच कमी आहे. जर तुम्ही या ट्रिपच्या नियमांमध्ये येत असाल तर तुम्हाला त्यासाठी फक्त 25 रुपये द्यावे लागणार आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये संपूर्ण भारत फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
https://www.jagritiyatra.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये तरुणांची निवड बहुस्तरीय निवड प्रक्रियेनंतरच केली जाते. या सहलीसाठी तुम्ही 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकता.
या सहलीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या काळात तुम्हाला नवीन लोक भेटतात. तसंच, अशी शक्यता आहे की तुम्हाला अशा ठिकाणांची नावं ऐकायला मिळतील जी तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसतील. याशिवाय, लोकांच्या मूळ गावांच्या कथा तुम्हाला भारतातील विचित्र ठिकाणे एक्सप्लोर करण्याची संधी या ट्रेनमुळे मिळणार आहे.