Janhvi Kapoor On Wedding Rumours : गेल्या दिवसांपासून जान्हवी कपूर तिरुपती मंदिरात बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने आता खुलासा केलाय.
श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी लेक गेल्या काही दिवसांपासून चर्चे आहेत. ती बॉयफ्रेंडसोबत तिरुपती मंदिरात लग्न करणार असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत.
एवढंच नाही तर ती कोणती साडी नेसणार आहे इथपर्यंत सोशल मीडियावर पापाराझी पेजवर बातम्या झळकत आहेत.
जान्हवी आणि शिखर पहाडिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ही दोघ नुकताच अनंत अंबानी आणि राधिकी मर्चंट यांच्या पार्टीत दिसले होते.
जान्हवी शिखरसोबत अनेक वेळा तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जान्हवी खरंच तिरुपतीला लग्न करणार आहे का यावर खुद्द अभिनेत्रीने खुलासा केलाय.
जान्हवी तिरुपतील लग्न करणार असून सोनेरी रंगाची साडी नेसणार आहे, ही पोस्ट पाहून तिने या लग्नाचं सत्य सांगितलं.
तिने या पोस्टवर रिप्लाय दिला की, काहीही...तिच्या या प्रतिक्रियेनंतर जान्हवी आणि शिखरच्या लग्नाबद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट झालंय.