साउथ अभिनेत्री नयनताराने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने लाल साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
नयनतारा ही साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
नयनताराच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे लाल रंगाच्या साडीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. नयनताराचा हा साडी लूक करवा चौथसाठी योग्य पर्याय असू शकतो.
लाल साडीमध्ये नयनताराने जबरदस्त फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती एखाद्या नववधूसारखी दिसत आहे. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये तिने लाल साडी, कानात झुमके, गजरा आणि साडीवर मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.
नयनताराच्या या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक असतात. इन्स्टाग्रामवर तिचे 9.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.