जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शाहरुख खानने ऐश्वर्या रायवर केलेल्या टिप्पणीवर मला त्याला थप्पड मारायची होती.
शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय पहिल्यांदा 'मोहब्बतें' चित्रपटात आणि नंतर 'जोश' या चित्रपटात दिसले होते.
'चलते चलते' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. वारंवार घटना घडत असल्यामुळे शाहरुख खानने ऐश्वर्याच्या जागी राणी मुखर्जीला घेतले होते.
याचवेळी दोघांमध्ये काही मतभेदही समोर आले. पण त्यांच्यातील मतभेदाचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. त्यानंतर शाहरुख खानला अनेक चित्रपट गमवावे लागले होते.
शाहरुख खानने ऐश्वर्या रायची माफी देखील माहितली होती. शाहरुख खान- ऐश्वर्यामुळे बच्चन कुटुंबही चिंतेत होते. जया बच्चन शाहरुख खानवर नाराज होत्या.
जया बच्चन यांनी या प्रकरणी मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या की, मला त्याच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही आणि मी त्याच्याशी याबद्दल बोलणार आहे. जर शाहरुख माझ्या घरी असता तर त्याला मी थप्पड मारली असती.
ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले होते. त्यावेळी शाहरुख खान उपस्थित नव्हता. त्यानंतर बच्चन कुटुंब आणि शाहरुख खान यांच्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
त्याचवेळी जया बच्चन यांनी असेही म्हटले होते की, जर ऐश्वर्या रायने शाहरुख खानला लग्नाचे आमंत्रण दिले तर ती लग्नाची तारीख बदलेल.