PHOTOS

'धर्मेंद्र म्हणजे 'ग्रीक गॉड', तुझ्याऐवजी मी..'; जया बच्चनने हेमा मालिनीसमोर मन मोकळं केलं अन्...

Jaya Bachchan Talked About Her Huge Crush: जय बच्चन या त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. मनात असेल ते बोलून टाकण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती अभिनेत्री हेमा मालिनीला एका जाहीर कर्यक्रमात आली. नेमकं घडलं काय ते पाहूयात...

Advertisement
1/13

एका जाहीर कार्यक्रमामध्ये हेमा मालिनी समोर असतानाच जया यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्या नेमकं काय म्हणालेल्या पाहूयात...

2/13

अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या वक्तव्यांबरोबरच मनोरंजनसृष्टीमधील योगदानाशिवाय खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. पती अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचे त्यांचं गोडं नातं कधी केबीसीमुळे तर कधी संसदेतील एखाद्या विषयावरुन मुद्दा मिळाल्याने चर्चेत असतं. 

3/13

जया बच्चन ओठावर एक आणि मनात एक असं न ठेवणाऱ्या मोजक्या बिनधास्तपणे रोखठोकपणे आपली भूमिका मांडणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. मध्यंतरी त्यांनी अमिताभ वगळता अन्य एक कलाकार आपल्याला फार आवडायचा असा खुलासा केला होता. हा अभिनेता आपलं क्रश होता असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.

4/13

जया बच्चन यांनी आपला जीव त्याच्यावर जडला आहे असं म्हणत ज्या अभिनेत्याचं नाव घेतलं होतं ते अभिनेते होते, धर्मेंद्र! 2007 साली 'कॉफी विथ करण'च्या कार्यक्रमामध्ये जया बच्चन धर्मेंद्र यांच्याबद्दल मनमोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या.

 

5/13

जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांना 'ग्रीक गॉड'ची उपमा दिली होती. तसेच पहिल्यांदा आपण जेव्हा धर्मेंद्र यांना भेटलो होतो तेव्हा नेमकं काय बोलावं हे कळत नव्हतं, असंही जया यांनी सांगितलेलं. 

 

6/13

विशेष म्हणजे धर्मेंद्र यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबतीने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जया बच्चन या त्यांच्यासमोरच त्यांच्या पतीच्या सौंदर्यावर आपण कसे भाळलो होतो हे सांगत होत्या.

7/13

"तुझ्याऐवजी मीच बसंतीची भूमिका साकारायला हवी होती कारण मला धर्मेंद्र फार आवडायचे. मी जेव्हा त्यांना पाहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मी एवढी नर्व्हस झाले होते की, काय करावं हे मला कळत नव्हतं. ते अगदी ग्रीक देवतेप्रमाणे वाटत होते," असं जया यांनी 'कॉफी विथ करण'मध्ये म्हटलं होतं. 

 

8/13

'शोले' चित्रपटामध्ये जया यांनी राधा नावाच्या विधवेची भूमिका साकारलेली तर हेमा यांनी बसंतीची भूमिका साकारलेली. 

9/13

चित्रपटामध्ये विरुची भूमिका साकारणाऱ्या धर्मेंद्र यांना बसंती आवडायची तर जय आणि राधा यांची प्रेमकथा फुलत असल्याचं कथानक होतं. त्यामुळेच जया यांनी बसंतीची भूमिका मी करायला हवी होती असं म्हटलं होतं.

10/13

मात्र शोलेमध्ये एकमेकांबरोबर जोडीने काम करण्याची संधी मिळाली नसली तरी जया आणि धर्मेंद्र या दोघांनी 'मिली','चुपके चुपके' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

11/13

त्यानंतर धर्मेंद्र आणि जया या दोघांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी'मध्येही एकत्र काम केलं होतं.

12/13

जया यांना धर्मेंद्र आवडायचे तरी त्यांची खरी लव्ह स्टोरी अमिताभ यांच्यासोबत सुरु झाली ती 'जंजीर' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान. त्यानंतर या दोघांनी 1973 साली लग्न केलं. 

13/13

जया आणि अमिताभ यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यापैकी एक मानली जाते. तर दुसरीकडे धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या जोडीचा चार्म आजही अनेक दशकांनंतरही तसाच टिकून आहे हे विशेष!





Read More