Jeshtha Gauri Pujan Wishes in Marathi : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन सोनपावलांनी होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा आणि मंगलदिन साजरा करा.
आली आली गौराई सोन पावलांच्या रुपाने आली आली गौराई धनधान्यांच्या रूपाने गौरी आवाहनाच्या शुभेच्छा
सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई, पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई! गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना! ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी, उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली! ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याच्या पावली गौराई घरी आली, आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली! ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरी-गणपतीच्या आगमानसाठी सजली संपूर्ण धरणी, सोन्याच्या पावलांनी गौरी येऊ दे आपल्या घरी, लाभो आपणास सुख-समृद्धी होवो आपली प्रगती ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेकी-सुनांची माय माऊली देईल मायेची सावली, आली गौराई माहेराला, भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला करा तिची मनोभावे सेवा ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याच्या पावलाने येणारी श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवो गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!