Jio affordable plan: जिओ नेहमी स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचा आणि आपल्या ग्राहकांना नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करते. आता असाच एक जिओचा प्लान आहे, ज्याबद्दल फार कमी जिओ यूजर्सना माहिती असेल.
तुम्ही एक महिन्याचा रिचार्च प्लान घेतला असेल तरी तुम्हाला त्यात 30 किंवा 31 पूर्ण दिवस मिळत नाहीत, हे तुम्ही पाहिले असेल. त्यामुळेच जिओचा हा प्लान इतरांपेक्षा थोडा खास आहे.
जिओच्या 319 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या प्लानला 'कॅलेंडर महिन्याची वैधता' म्हणतात. इतर प्लानप्रमाणे हा प्लॅन ठराविक दिवसांसाठी नाहीय. तुम्ही रिचार्ज केल्याच्या दिवसापासून पुढच्या महिन्यात त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत या प्लानची वैधता असते.
समजा तुम्ही 5 ऑगस्टला रिचार्ज केल्यास हा प्लान सप्टेंबरपर्यंत चालेल आणि त्यानंतर तुम्हाला 5 सप्टेंबरला पुन्हा रिचार्ज करावे लागेल. यामुळे आपल्याला रिचार्ज केव्हा करायचे हे लक्षात ठेवणे सोपे जाते. पोस्टपेड प्लानमध्ये अशी सुविधा असते पण प्रीपेड प्लानमध्येदेखील जिओ ही सुविधा देतेय.
या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB हायस्पीड इंटरनेट मिळेल. एका दिवसात 1.5 GB संपल्यानंतर तुमचा वेग कमी होईल पण तुमचे कनेक्शन तुटणार नाही. तुम्ही भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित कॉल करू शकता.
या प्लानद्वारे तुम्ही दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. जे संपर्कात राहण्यासाठी पुरेसे आहे. या प्लॅनची वैधता कॅलेंडर महिन्यानुसार आहे, म्हणजेच हा प्लॅन रिचार्जच्या तारखेपासून पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत चालतो.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लान देण्यास सांगितले होते. याला प्रतिसाद देत जिओने 296 आणि 259 रुपयांचे प्लान आणले होते.
296 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांसाठी 25 जीबी डेटा उपलब्ध होता. 259 रुपयांच्या प्लानची कॅलेंडर महिन्याची वैधता 319 रुपयांच्या प्लानसारखीच होती. हे दोन्ही प्लान आता बंद करण्यात आल्या आहेत.