मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे दर वाढवल्यानंतर यूजर्स दुसऱ्या कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.जिओचे बरेच यूजर्स बीएसएनएलकडे गेल्याचे दिसून आले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिओ दरवेळेस नवीन प्लान घेऊन येत असते.
मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे दर वाढवल्यानंतर यूजर्स दुसऱ्या कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.जिओचे बरेच यूजर्स बीएसएनएलकडे गेल्याचे दिसून आले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिओ दरवेळेस नवीन प्लान घेऊन येत असते.
जिओ आपल्या वेगवेगळ्या कॅटगरीतील ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान आणत असते. जिओने आपल्या कोट्यावधी युजर्ससाठी 175 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला फ्री मेंबर्शिपदेखील मिळणार आहे.
हा जिओ रिचार्जचा पर्याय एंटरटेन्मेंट कॅटगरीमध्ये येतो. जिओ अॅपच्या माध्यमातून किंवा वेबसाइटवर यूजर्स हा प्लान घेऊ शकतात. रिलायन्स जिओच्या 175 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यामध्ये कोणत्याही लिमिटशिवाय एकूण 10 जीबी डेटा मिळेल.
हा रिचार्ज प्लान 28 दिवसांठी वैध असेल. यामध्ये केवळ डेटाची सुविधा आहे. यामध्ये फ्री कॉलिंग नसेल, याची यूजर्सनी नोंद घ्या.
यूजर्स आपल्या सध्याच्या रिचार्ज प्लानसोबत याचा वापर करु शकतात. या प्लानमध्ये अनेक ओटीटी अॅप्सची फ्री मेंबरशिप मिळतेय. यामध्ये सोनी लिव्ह, जी5, जिओ, सिनेमा प्रमियम, लायसगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कंचा लन्नका, चौपाल, डॉक्यूबे, एपिक ऑन हायचॉय यांचा समावेश आहे.
जिओने 329 रुपये, 1029 रुपये आणि 1049 रुपयांचे 3 एंटरटेन्मेंट प्लान लॉंच केले आहेत. या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ओटीटी अॅप्स सब्सस्क्रिप्शन आणि डेली डेटा सारखे अनेक फायदे आहेत.
हे विविध प्लान तुम्हाला कंपनीची अधिकृत वेबसाइटच्या एंटरटेन्मेंट सेक्शनमध्ये दिसू शकतील. येथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीचा प्लान निवडू शकता.
जिओ फ्रीडम प्लानची किंमत 355 रुपये असून याची वॅलिडीटी पूर्ण 30 दिवसांची आहे. हा प्लान जिओच्या इतर प्लानपेक्षा वेगळा आहे. तुम्ही पूर्ण दिवस अनलिमिटेड कॉलिंग करु शकता. यासोबतच तुम्हाला 25 जीबी डेटा मिळेल, ज्यामध्ये रोजची लिमिट नसेल. तुम्हाला वाटल्यास तुम्ही डेटा पूर्ण दिवसात किंवा एक महिन्यात कधीही वापरु शकता. यासोबतच तुम्हाला रोज 1 हजार रिचार्ज मिळणार आहेत.