सामान्य जनता असो वा पोलीस प्रशासनातील लोक, त्यांच्या हल्ल्यातून कोणीही सुटू शकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे महिलांच्या या कृतीचा कोण राग करत नाही.
भारतात अनेक लग्न आपल्या आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात असतात. आपले लग्न व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. अशावेळी काहीजण जुन्या प्रथा परंपरेचा आधार घेतात.
भारतातील जोधपूरमध्ये एक अनोखी प्रथा आहे. लग्नाळू पुरुषांचा या प्रथेवर खूप विश्वास आहे. यासाठी त्यांना महिलांचा मार खावा लागतो. काय आहे ही प्रथा? जाणून घेऊया.
भारतातील हा एकमेव सण आहे जिथे फक्त महिलांचे वर्चस्व आढळून येते. येथे महिला रात्रभर काठ्या घेऊन फिरत असतात. तसेच समोरून येणाऱ्या कोणत्याही माणसाला काठीने मारायला लागतात.
सामान्य जनता असो वा पोलीस प्रशासनातील लोक, त्यांच्या हल्ल्यातून कोणीही सुटू शकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे महिलांच्या या कृतीचा कोण राग करत नाही. त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. सर्वजण आनंदाने मार खातात.
ही प्रथा म्हणजे जोधपूरमध्ये होणाऱ्या जत्रेचा एक भाग आहे. जी वर्षानुवर्षे पाळली जात आहे. या जत्रेमध्ये महिला या राजा राणी, भगवान शिव विष्णू, जाट, डॉक्टर, पोलीस अशा अनेक वेषात बाहेर पडतात. महिलांची ही रूपे पाहून महिला सक्षमीकरणाचा संदेश मिळतो.
ज्या अविवाहित पुरुषावर स्त्रीची काठी पडते त्याचे लग्न लवकर होते, असे येथे मानले जाते. त्यामुळे अनेक पुरुष या आशेने जत्रेत पोहोचतात आणि आनंदाने काठी खातात.
ही जत्रा स्त्री शक्ती आणि शिस्तीचे प्रतीक मानली जाते. येथे फक्त महिलाच राज्य करतात. हा उत्सव रात्री बारा वाजता सुरु होतो ते पहाटे 4 वाजेपर्यंत चालतो. या काळात महिलांची धमाल मस्ती सुरू असते.
या जत्रेत 16 दिवस पूजेचे आयोजन केले जाते. जोधपूरच्या लोकांसाठी ही पूजा खूप खास आहे. हे चैत्र शुक्लच्या तृतीयेला सुरू होते आणि वैशाख कृष्ण पक्षाच्या तृतीयेला संपते.