me : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्य...
इंग्लंड संघ 22 मे पासून पाकिस्तानविरुद्ध 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळेच, आगामी पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या दृष्टीकोनातून इंग्लंडचे खेळाडूंनी मायदेशी परतण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये मोईन अली, जॉस बेअरस्टो, जॉस बटलर, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि रीस टोपली यांचा समावेश आहे.
राजस्थानचा स्टार फलंदाज जॉस बटलर याने आज राजस्थानला निरोप दिलाय. तो उर्वरित हंगामात खेळताना दिसणार नाही.
तर आरसीबीचे दोन स्टार खेळाडू विल जॅक्स आणि रीस टोपली यांनी देखील बंगळुरू संघाला रामराम ठोकला आहे.
तसेच इंग्लंडचे उर्वरित खेळाडू आठवड्याच्या शेवटी यूकेमध्ये परतण्याची अपेक्षा आहे.