चित्रपट प्रेमींना 18 जुलै हा दिवस उत्सवासारखा भासणार आहे. या दिवशी विविध प्रकारचे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्यात खास काय आहे, ते जाणून घेऊया.
18 जुलै हा दिवस बॉलिवूड आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे, कारण एकाच दिवशी तब्बल 6 मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
'सैयारा' ही एक हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे ज्यातून अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. या चित्रपटात अहानसोबत अनिता पद्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'मर्डरबाद' हा एक थरारक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. ट्रेलरनुसार, जयपूरमधील एका राजवाड्यात पाहुणा बेपत्ता झाल्यानंतर चित्रपटातील खरा खेळ सुरू होतो. या चित्रपटात शरीब हाश्मी, अमोल गुप्ते, मनीष चौधरी, नकुल रोशन सहदेव आणि कनिका कपूर यांच्या भूमिका असणार आहेत
'तन्वी द ग्रेट'मध्ये ऑटिझम (Autism)असलेल्या तन्वीने तिच्या शहीद वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्याचा घेतलेला निर्णय दाखवण्यात आला आहे. शुभांगी दत्त तन्वीची भूमिका साकारते, तर अनुपम खेर, इयान ग्लेन, बोमन इराणी, पल्लवी जोशी, अरविंद स्वामी आणि करण टकर तिच्यासोबत झळकणार आहेत.
'निकिता रॉय' हा एक क्राइम ड्रामा असून सोनाक्षी सिन्हा, अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहेल नय्यर यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा करत आहे.
'5 सप्टेंबर' हा एक भावनिक स्पोर्ट्स ड्रामा आहे ज्यात कुणाल शमशेरे मल्ला, संजय मिश्रा, केविन दवे, दीपराज राणा, अतुल श्रीवास्तव, मलिहा मल्ला आणि ब्रिजेंद्र काला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हा चित्रपट 17व्या शतकातील संत तुकारामांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात त्यांच्या भक्ती आणि कवितांमधून समाजात झालेल्या परिवर्तनाची कथा पाहायला मिळणार आहे.