Monthly Horoscope July 2025 in Marathi : जुलै म्हणजे आषाढ - श्रावण महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना असतेच. जुलै महिन्यात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळणार आहे. तर मेष आणि मकरसह अनेक राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. काही लोकांना व्यवसायात मोठा फायदा आणि नोकरदार लोकांना मोठी ऑफर मिळणार आहे. काही लोकांसाठी शनि वक्री अशुभ ठरणार आहे. एकंदीत जुलै महिना हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्त्र आनंद पिंपळकर यांच्याकडून
आषाढ - श्रावण महिना हा लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे. सरकारी योजना, कर संकलन किंवा कंत्राटी कामाशी संबंधित लोकांना अनपेक्षित नफा प्राप्त होणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर जुने ग्राहक परत तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला नवीन सौदे देखील मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा हस्तांतरणाची संधी मिळणार आहे. फ्रीलान्सिंग, डिजिटल काम किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन प्रकल्प प्राप्त होणार आहे. विमा, पीएफ किंवा बाँड सारख्या जुन्या गुंतवणुकीमुळे आंशिक परतावा मिळणार आहे. शेअर बाजार किंवा क्रिप्टोमध्ये हुशारीने गुंतवणूक करणे हिताचे ठरणार आहे. व्यवसायिक सहली यशस्वी या महिन्यात यशस्वी होणार आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रलंबित प्रकरण मार्गी लागणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी या महिन्यात स्थिरता तसंच करिअरमध्ये विस्तार होणार आहे. विशेषतः जर तुम्ही अलीकडेच नवीन व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर आता त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहे. भागीदारीशी संबंधित कामात विश्वास आणि पारदर्शकता आवश्यक राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना बॉसकडून कौतुक होणार आहे. त्यांना टीम लीडरशिपसारख्या जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहे. खाजगी क्षेत्राशी संबंधित लोकांना बोनस किंवा प्रोत्साहन मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होणार आहे. जर तुम्ही बँकेच्या कर्जासाठी अर्ज केला असेल तर मंजुरी मिळणार आहे. प्रवास खर्च होणार असून पण ती दीर्घकाळात त्याचा फायदा मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमची आर्थिक रणनीती बदलण्याची आवश्यकता असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे असणार आहे. विशेषतः म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये लक्ष द्या. व्यवसायात भागीदार किंवा कर्मचाऱ्याकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित या महिन्यात हिताचे ठरणार आहे. नोकरीत अचानक दबाव वाढणार आहे. पण बोनस किंवा पदोन्नती मिळणार आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुम्हाला जुन्या क्लायंटशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परदेश दौरा किंवा आंतरराष्ट्रीय करार होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी येणारा महिना यशाने भरलेला राहणार आहे. प्रकल्प आणि कामांमध्ये तुमची मेहनत फळाला येणार आहे. तांत्रिक, अभियांत्रिकी, सल्लागार आणि आरोग्यसेवेशी संबंधित लोकांसाठी हा महिना विशेषतः फायदेशीर सिद्ध होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळणार आहे. नवीन गुंतवणूक भविष्यात मोठे फायदे देखील होणार आहेत. व्यवसायात मार्केटिंग किंवा डिजिटल प्रमोशनवर केलेले खर्च चांगले परतावे देणारे ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या, हा तुमच्यासाठी संतुलन निर्माण करण्याचा काळ असणार आहे. जास्त खर्च करू नका किंवा जास्त रोखू नका. प्रवासावर केलेल्या खर्चामुळे तुम्हाला नवीन करार प्राप्त होणार आहे. सरकारी विभागांशी संबंधित कामांमध्ये प्रलंबित पैसे मिळणार आहे. तुमचे जुने बिल मंजूर होणार आहेत.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत प्रगतीचा ठरणार आहे. तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या जलद प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला महिला अधिकारी किंवा गुंतवणूकदाराकडून लाभ मिळणार आहे. किरकोळ व्यवसाय, आयात-निर्यात किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचा महिना असणार आहे. यावेळी रिअल इस्टेट किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरणार आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी यशस्वी होणार आहे. जुन्या ग्राहकांकडून तुम्हाला थकबाकीची रक्कम मिळणार आहे. प्रवास करताना काळजी घ्या, अन्यथा एखादी चूक तुम्हाला दीर्घकाळ महागात पडण्याची शक्यता आहे. एका छोट्याशा चुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मासिक बजेटचे पालन करा अन्यथा अडचणीत येऊ शकता.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना नफा, पैशाच्या आणि आर्थिक बाबींमध्ये प्रगतीने भरलेला असणार आहे. या महिन्यात तुम्हाला नवीन नोकरी किंवा करिअर बदलाची संधी मिळणार आहे. व्यवसायातील जुना रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहे. आर्थिक लाभ हळूहळू वाढणार आहे. जुलैच्या पहिल्या महिन्यापासून शुभ संकेत दिसणार आहे. आर्थिक स्थिरतेसाठी तुमचे खर्च मर्यादित ठेवा. सध्या शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करु नका. जर तुम्ही अभ्यास किंवा प्रशिक्षणाशी संबंधित क्षेत्रात असाल तर हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप अनुकूल राहणार आहे. प्रवासाशी संबंधित खर्चाचे आगाऊ नियोजन करा जेणेकरून बचत होईल. या महिन्यात तुम्ही बाजाराची परिस्थिती पाहूनच कोणतीही गुंतवणूक करा. अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना नफा आणि आर्थिक बाबतीत प्रगतीने भरलेला राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामगिरी पार करणार आहेत. व्यवसाय विस्तारणार आहे. जर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज केल्या असतील तर तुम्हाला त्याची मंजुरी मिळणार आहे. वर्षाच्या पहिल्या भागात ज्या आर्थिक आव्हाने होती ती आता दूर होणार आहे. गुंतवणूकदार, एजंट किंवा विमा सल्लागारांसाठी हा महिना उपयुक्त ठरणार आहे. कर आणि कर्जाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा पाहिला मिळणार आहे. व्यवसायाच्या सहलींमधून नवीन करार शक्य होणार आहे. उत्पन्नात सातत्य राहणार आहे. जर तुम्ही व्यापारी असाल आणि काही नवीन कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला नफा मिळणार आहे. तुम्ही पुढे जाऊन कठोर परिश्रम करावेत लागणार आहे.
या राशीच्या लोकांना जुलै महिन्यात खूप धावपळ करावी लागणार आहे. या महिन्यात तुम्ही एकाच वेळी अनेक कामे हाताळाल आणि आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायात नवीन करार किंवा परदेशी क्लायंटशी संपर्क साधणार आहे. मार्केटिंग, ब्रँडिंग आणि जाहिरातींशी संबंधित खर्च भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. जे लोक यंत्रसामग्री, वाहने किंवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना मोठी ऑर्डर मिळणार आहे. सरकारी विभागांकडून पैसे मिळणार आहे. महिन्याच्या मध्यात, पोटाशी संबंधित आरोग्य समस्या कार्यक्षमतेवर परिणाम करणार आहे. उत्पादकता अबाधित राहण्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा महिना तुमच्यासाठी प्रगतीची आणि पैशाच्या बाबतीत मोठे फायदे मिळणार आहे.
या राशीसाठी हा महिना पैशाच्या बाबतीत थोडा अस्थिर राहणार आहे. म्हणून आर्थिक निर्णय सुज्ञपणे घेणे हिताचे ठरणार आहे. व्यवसायात काही तात्पुरते अडथळे येतील. पण तुमच्या प्रयत्नांमुळे तोडगा निघणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, लेखन किंवा कायद्याशी संबंधित लोकांसाठी हा नवीन कामगिरीचा काळ असणार आहे. तुम्हाला अचानक पैशाच्या बाबतीत मोठा नफा मिळणार आहे. आर्थिक दबाव कमी होणार आहे. पण खर्च अजूनही नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. तुम्हाला एखाद्या अनुभवी मित्राची किंवा माजी सहकाऱ्याची मदत मिळणार आहे. प्रवास फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः जर ते क्लायंट मीटिंग किंवा व्यापाराशी संबंधित असतील तर. तुम्हाला नोकरीत नवीन आणि उत्तम संधी प्राप्त होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअरच्या बाबतीत चढ-उताराचा असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये निर्णायक पावले उचलणार आहे. एखादा मोठा करार अंतिम होणार आहे. ज्यामुळे दीर्घकाळ उत्पन्न मिळणार आहे. व्यवसायात जोखीम घेणे फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांमध्ये फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात मोठे संकट येणार आहे. कोणताही निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. पण, काही लोकांसाठी पदोन्नती मिळणार आहे. त्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असणार आहे. महिन्याच्या शेवटी नवीन प्रकल्प सुरू करणे भविष्यासाठी स्थिर उत्पन्नाचे स्रोत असणार आहे. तुमच्या संचित संपत्तीमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही.
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत मोठे फायदे मिळणार आहे. तुमच्या कामाला गती मिळणार आहे. तुम्ही नवीन उंची गाठणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून व्यवसायाकडे वाटचाल करू इच्छित असाल तर या महिन्यात तुम्हाला एक नवीन दिशा देणारा असणार आहे. माध्यमे, शिक्षण, साहित्य आणि वैज्ञानिक क्षेत्रातील लोकांना नवीन प्रकल्प मिळणार आहे. कामाचा दबाव असेल पण उत्पन्नही त्याच प्रमाणात वाढणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम घेऊ नका. जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांकडून आर्थिक मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरणार आहे. पैसे आणि सन्मानाच्या बाबतीत तुम्हाला मोठे फायदे मिळणार आहे. तुम्हाला अचानक कुठूनतरी उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक संधी मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक विकासाच्या दिशेने मजबूत पावले उचलण्यासाठी असणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. व्यवसायात जुना करार पुन्हा सुरू होणार आहे. फ्रीलांसर आणि कंत्राटी कामगारांना अचानक मोठी ऑर्डर मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत असणार आहे. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. पण कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे हिताचे असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून प्रवास करणे थोडे हानिकारक असणार आहे. म्हणून अनावश्यक खर्च टाळा. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. (Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)