July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
जुलैमध्ये बुध, मंगळ आणि शुक्र ग्रहांचं गोचर होणार असल्याने जुलै महिना हा काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. कधी आहे ग्रहांचं गोचर आणि कुठल्या राशींचं भाग्य उजळणार ते पाहूयात.
महिन्याच्या पहिला तारखेला म्हणजे 1 जुलैला मंगळ सिंह राशीत संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रह हा धैर्य, शौर्य, मालमत्ता आणि विवाहाचा कारक आहे.
बुध ग्रह 8 जुलैला कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रह गोचरच्या वेळी बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने बुधादित्य हा शुभ योग जुळून येतो आहे. यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे.
संपत्तीचा कारक शुक्र ग्रह 7 जुलैला सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र सध्या कर्क राशीत विराजमान आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींनी भौतिक सुख मिळणार आहे.
जुलै महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. या महिन्यात फक्त जोडीदाराशी बोलताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक करा.
जुलै महिन्यात या राशीच्या लोकांना नवीन मालमत्ता आणि वाहन घेण्याची सुवर्ण संधी आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. बँक बलेन्स वाढणार आहे. एकंदरीत हा काळ सुवर्ण ठरणार आहे.
जुलै महिना हा कर्क राशीसाठी धनलाभाचा ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. रखडलेली कामं सहज पूर्ण होणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.
जुलै महिना हा कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली ठरणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी लोकांचे सहकार्य लाभणार आहे. फक्त या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
जुलै महिना हा तूळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी उघडणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. नवीन गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
तुमच्या व्यवसाय करण्याचा विचार असेल तर जुलै महिना तुमच्यासाठी शुभ असणार आहे. जोडीदारांचं नातं मजबूत होणार आहे. अचानक कुठून तरी धनलाभ होणार आहे. मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी जुलै महिना सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होणार आहे.
जुलै महिना हा मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. परदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)