Monthly Rashifal July 2023 : जुलैचा पहिला आठवड्यातील ग्रह गोचरमुळे काही राशींच्या नशिबात पैसाच पैसा आहे. तुमच्यासाठी जुलै महिना कसा असेल जाणून जुलै महिन्याचं राशीभविष्य.
जुलैच्या पहिलाच तारखेला मंगळ गोचर होणार आहे. त्यासोबत अजून दोन ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशातच अनेक राशींच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्यशाली ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना जुलै महिन्यात चढ उतार पाहिला मिळणार आहे. तणाव आणि चिंतेमुळे आरोग्याची समस्या जाणवणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्चिक महिना असणार आहे. नातेसंबंधात तणाव जाणवेल. आर्थिक व्यवहारात थोडा चांगला काळ असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना ठिकठाक असणार आहे. आर्थिक व्यवहारात अनेक अडचणी येणार आहेत. कार्यक्षेत्रात यशासाठी अधिक महेनत करावी लागणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून हा महिना बरा असणार आहे. या महिन्यात आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. व्यवसायींकांसाठी हा महिना फायदाचा ठरणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल.
या राशीसाठी जुलै महिना फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रवासाचे योग आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येईल. नोकरीच्या ठिकाणी बढती आणि पगारवाढ अपेक्षित आहे. शेअर बाजारात आर्थिक फायदा होईल. कुटुंबात सुख समृद्धी नांदणार आहे. व्यवसायिकांना
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जरा चिंताजनक असेल. करिअरसंबंधात चढ उतार पाहिला मिळेल. प्रवासातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये तणाव असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अतिशय शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाचे योग जुळून आले आहेत. प्रवासातून नवीन ओळख होईल ज्याचा फायदा भविष्यात होणार आहे. बोलण्यावर या महिन्यात नियंत्रण ठेवा. या महिन्यात आर्थिक स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग मिळणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा महिना फायदेशीर असणार आहे.
हा महिन्या कन्या राशीच्या लोकांसाठी कठीण असणार आहे. मोठं निर्णय घेताना चार वेळा विचार करा. तुमची मेहनत या महिन्यात तुम्हाला कठीण काळ दाखवणार आहे. कार्यक्षेत्रात पदोन्नती होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना भाग्यशाली ठरणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या हा महिना फलदायी आहे. कुटुंब आणि मित्रांची साथ मिळणार आहे. कार्यक्षेत्रात आनंदीय वातावरण असणार आहे. मात्र वैवाहिक जीवनात तणाव असेल. आरोग्याची समस्या जाणवणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना ठिकठाक असणार आहे. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक स्थिती ठिक राहील. बदलीची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. शुभ कार्य ठरणार आहे. घरातील सदस्यांसोबत वादविवाद होऊ शकतो. कुठलाही निर्णय घेताना मोठ्याच्या सल्ल्याने घ्या.
या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात. जागा बदलण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतमुळे तुम्ही चिंतेत असाल. कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. महिन्याच्या शेवटी परिस्थिती बरी असेल.
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. मात्र या महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करु नका. विवाह इच्छुकाच्या लग्नाचा प्रश्न मिटणार आहे. नातेसंबंधात गोडवा असेल. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. प्रमोशन आणि इक्रीमेंट होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांनी जुलै महिन्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती ठिकठाक राहिल. अध्यात्मिककडे तुमचा कल वाढणार आहे. कार्यक्षेत्रात हा महिना ठिक असेल. व्यवसायिकांसाठी हा महिना ओके ओके असेल. हा महिना कंटाळवाना असेल. नोकरदार वर्गाने कामामध्ये लक्ष द्यावे.
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये अनेक फायदे होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला असणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न असेल. ओळखीतून फायदा होणार आहे. स्वभावामुळे अनेकांचं मनं जिंकणार आहात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)