PHOTOS

Horoscope June 2023 : जूनमध्ये सूर्य, शनीसोबत बुध ग्रहाच्या गोचरमुळे नशिब चमकणार! कसा असेल जून महिना तुमच्यासाठी?

June 2023 Monthly Horoscope : ग्रह आणि नक्षत्रांची दिशा आणि स्थिती एका ठरावीक वेळेनंतर बदलत असते. जून महिन्या हा अतिशय शुभ आहे. काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. 

Advertisement
1/13
जून महिन्याचे राशीभविष्य (June Horoscope 2023 )
जून महिन्याचे राशीभविष्य (June Horoscope 2023 )

या महिन्यात शनी वक्री, सूर्य गोचर आणि बुध गोचर दोन वेळा होणार आहे. त्यामुळे जून महिना कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईट ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

2/13
मेष (Aries)
मेष (Aries)

या राशीसाठी जून महिन्या संमिश्र असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अचडणी येण्याची शक्यता आहे. शनि वक्रीचालीमुळे तुमचा विकास होण्याचे मार्ग उघडतील. शनिमुळे तुम्हाला लाभाचे संकेत आहे. प्रवासाचे योग आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्या. 

3/13
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना उत्तम असणार आहे. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. प्रत्येक कामात उत्तम यश मिळणार आहे. नात्यात मात्र थोड गोड आणि थोड आंबट असा अनुभव येणार आहे. शिवाय आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

 

4/13
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना आनंदाने जाणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी येणार आहे. पण त्यावर मात करुन तुम्ही प्रगती गाठणार आहात. या महिन्यात पैसा खर्च होणार आहे. त्यातूनही तुम्हाला फायदा होणार आहे. 

5/13
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना शुभ असणार आहे. नोकरी बदलची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. प्रवासातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये तणाव जाणवेल. शिवाय तब्येची काळजी घ्या. 

6/13
सिंह (Leo)
सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना भाग्यशाली असणार आहे. अचानक अनेक मार्गाने धनलाभ होणार आहे. नात्यांमध्ये गोडवा वाढणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे संकेत आहेत. धार्मिक कार्यासाठी प्रवासाचे योग आहे. 

7/13
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा महिन्या लाभदायक असणार आहे. करिअरमध्ये यशाचे शिखर गाठणार आहात. आर्थिकदृष्ट्या चांगला घडामोडी घडणार आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे दिवस असणार आहेत. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या महिन्यात खर्चही वाढणार आहे तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. 

8/13
तूळ (Libra)
तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना छान असणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून हा महिना तुमच्यासाठी उंच शिखर घेऊन आला आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. आर्थिक स्थितीदेखील सुधारणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. आरोग्य सांभाळा. 

 

9/13
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना थोडी खूशी थोडा गम असा असणार आहे. कामामध्ये लक्ष द्या अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसायक करत असाल तर तिथे वाद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. घरात एखादं शुभ कार्य ठरणार आहे. आर्थिक बाबात हा महिना समिश्र असणार आहे. 

 

10/13
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. नवीन प्रकल्पातून यश मिळणार आहे. कुटुंबात मात्र चढ उतार पाहिला मिळणार आहे. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी ठिकठाक आहे. मात्र प्रेमप्रकरणात हा महिना चांगला ठरणार आहे. 

11/13
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य असणार आहे. यश प्राप्त करण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. व्यवसायात अचडणींचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबात मालमत्तेवरुन वाद होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात तणाव जाणवणार आहे. पैशांची अडचण जाणवणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

12/13
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना कठीण असणार आहे. कार्यक्षेत्रात अडचणी दिवसेंदिवस वाढणार आहे. नात्यामध्ये तणाव जाणवणार असून वादविवाद होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला खूप संयम दाखवावे लागणार आहे. आर्थिक स्थिती साधारण असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. 

13/13
मीन (Pisces)
मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं आणि कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कार्यक्षेत्रातील लोकांशी संबंध चांगले होणार आहे. हे संबंध भविष्यात तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात धनलाभाचे योग आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More