Kamada Ekadashi 2023 upay : आज कामदा एकादशीला शुभ संयोग तयार होत आहे. आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी आणि शनिदेव, विष्णूला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.
कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीच्या 5 पानांमध्ये हळद अर्पण करा आणि नंतर ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्या आर्थिक अडचण दूर होते असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
श्री हरी, शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या पूजेमध्ये तिळाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काळा तिळाचं दान करा.
गंगेच्या पाण्यात पांढरे तीळ मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करा. मग तीळ असलेल्या मिठाई अर्पण करा.
शनिवारी कामदा एकादशीला वाहत्या पाण्यात मूठभर काळे तीळ अर्पण करा.
दुधात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. असं केल्याने वाईट काळ दूर होतो.
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या एकादशीपासून प्रत्येक एकादशीला गरिबांना अन्नदान करा. असं मानलं जातं की यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होते.
मूठभर कच्च्या तांदळाला कुंकू लावून लाल सुती कपड्यात बांधून विष्णू मंदिरात अर्पण करा.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी कामदा एकादशीला भगवान विष्णूला हळदीच्या दोन गुंठ्या अर्पण करा आणि 'ओम केशवाय नमः' मंत्राचं जप करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)