'झी मराठी' नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन येत असते. आता या चॅनलवर एक आगळी-वेगळी मालिका सुरू होत आहे - 'कमळी'. या मिलकेतील कलाकारांचे 3000 विद्यार्थ्यांसह शिवस्तुतीचे पठण वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे. पाहूयात हा खास क्षण.
या मालिकेची कथा एका अशा ध्येयवेड्या मुलीभोवती फिरते, जिला ठाम विश्वास आहे की 'शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा खरा मार्ग आहे'. म्हणूनच ती आपल्या लहानश्या गावातून बाहेर पडते आणि मुंबईत येऊन मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहते.
तिचं अंतिम ध्येय मात्र आपल्या गावी परत जाऊन तिथेच एक महाविद्यालय सुरू करायचं आहे, जेणेकरून तिच्यासारख्या अनेक मुलींना शिकता येईल आणि आपले जीवन घडवता येईल.
मालिकेच्या प्रमोशनसाठी नुकताच ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट, गोखले रोड, नौपाडा येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात तब्बल 3000 शाळकरी मुलांनी आणि मुलींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्तुतीचे सामूहिक पठण केले आणि या अद्भुत उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये झाली. ही शिवस्तुती म्हणजे शिवरायांना एका अनोख्या पद्धतीने वंदन करण्याचा प्रयत्न होता.
यावेळी 'कमळी' मालिकेतील मुख्य अभिनेत्री विजया बाबर, तसेच केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढला.
कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला, त्यांच्याशी संवाद साधला आणि फोटोही काढली. नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मालिकेबद्दल आपले अनुभव आणि या विशेष उपक्रमाची आठवण पत्रकारांसोबत शेअर केली.
झी मराठीवरील 'कमळी'चा शिवस्तुतीवर आधारित प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
तर नक्की पाहायला विसरू नका, 'कमळी' 30 जूनपासून दररोज रात्री 9 वाजता, फक्त झी मराठीवर.
Photo Credit: PR Handover