T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
अफगाणिस्तानच्या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडंचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
सी गटामध्ये अफगाणिस्तान आता पहिल्या क्रमांकावर आहे, तर यजमान वेस्ट इंडिज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लीग स्टेजमधील दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे न्यूझीलंडची टीम अखेरच्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्यात उलटफेर पहायला मिळाला. यावेळी अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला होता.
तर न्यूझीलंडच्या टीमला वेस्ट इंडिजकडूनही पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे आता न्यूझीलंडच्या टीमला सुपर 8 मध्ये जागा मिळू शकलेली नाही.