भारतातील एकमेव मंदिर जिथे शिव शंकरासमोर नंदीच नाही, महाराष्ट्रात आहे ही जागा; पौराणिक कथा, वाचाच!
भारतात एकमेव असं मंदिर आहे जिथे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाहीये. कोणते आहे हे मंदिर जाणून घेऊयात अख्यायिका.
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिर आहे. गोदावरी नदीच्या काठावर कपालेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे एकमेव असं मंदिर आहे जिथे नंदी विराजमान नाहीयेत.
पौराणिक मान्यतेनुसार, या मंदिरात महादेवांनी निवास केला होता. या मंदिरात नंदी नाहीये, याची एक अख्यायिकादेखील सांगितले जाते.
मान्यतेनुसार, असं म्हणतात की, कोणे एकेकाळी ब्रह्मदेवांना 5 मुख होते. ज्यातील 4 मुखं वेदाचे पठण करायचे तर पाचवे मुख सतत निंदा करायचे. असं म्हणतात की, सतत निंदा करणाऱ्या मुखामुळं शिव शंकर नाराज झाले आणि त्यांनी ब्रह्मांचे मुख वेगळे केले. यामुळं भगवान शिव यांना ब्रह्म हत्येचे पाप लागले.
ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव ब्रह्मांडात सगळीकडे फिरत होते. मात्र त्यांना कुठेच उपाय सापडला नाही. जेव्हा ते सोमेश्वरमध्ये होते तेव्हा त्यांना पापापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सापडला.
सोमेश्वरमध्ये एका बछड्यांकडून त्यांना पापापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सापडला. असं म्हणतात की तो बछडा म्हणजे नंदीच होते. ते भगवान शंकरांसह गोदावरीच्या रामकुंडपर्यंत आले.
भगवान शिव यांनी कुंडात स्नान केल्यानंतर त्यांना ब्रह्म हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली. नंदी यांच्यामुळंच भगवान शिव यांना पापापासून मुक्ती मिळू शकली.
या घटनेनंतर भगवान शंकर यांनी नंदीला गुरू मानले आणि तिथेच शिवलिंगाच्या रुपात स्थापित झाले. तर, नंदी भगवान शिव यांचे गुरू मानले जाऊ लागले. त्यामुळं त्यांनी नंदींवा शिवलिंगासमोर स्थापित होण्यास नकार दिला. त्यामुळं कपालेश्वर मंदिरात फक्त शिवपिंड असून नंदी नाहीये. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)