PHOTOS

44 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचं समुद्रकिनारी लुंगीमध्ये फोटोशूट, हटके फॅशनची जोरदार चर्चा

44 वर्षीय करीना कपूरने समुद्रकिनारी दिल्या लुंगी मध्ये खास पोज. सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

Advertisement
1/9

करीना कपूरला नेहमीच बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणून ओळखलं जातं. रेड कार्पेट असो किंवा व्हेकेशन लूक. बेबोची स्टाईल नेहमीच चर्चेत असते.

2/9

अशातच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहे आणि तिचे आकर्षक लूक समोर येत आहेत. मात्र, यावेळी करीनाच्या बीचवरील लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3/9

तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने जे परिधान केले आहे ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

4/9

या फोटोंमध्ये करीनाने पिवळ्या रंगाचा हॉल्टर नेक स्विम टॉप घातला आहे. त्यावर तिने घातलेला स्कर्ट प्रत्यक्षात लुंगी स्कर्ट आहे.

5/9

करीनाचा लुंगी स्कर्ट ग्रीन रंगाचा आहे. त्यावर पांढऱ्या आणि लाल रंगाचे पट्टे आहेत. हा चेक पॅटर्नचा स्कर्ट घोट्याच्या लांबीचा आहे. जो तिला आरामदायी आणि क्लासी लूक देतो.

6/9

काळ्या रंगाची टोपी आणि काळ्या रंगाचा सनग्लासेसने हा लूक पूर्ण केला आहे. विना मेकअप आणि मोकळ्या केस सोडून ती हटके पोज देताना दिसत आहे. 

7/9

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, मी ग्रीसमध्ये लुंगी डान्स केला. खूप मजा आली असं तिने म्हटलं आहे. 

8/9

करीनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. चाहते त्यांच्या फोटोंवर वेगवेगळ्या इमोजी शेअर करत आहेत.

9/9

करीनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. चाहते त्यांच्या फोटोंवर वेगवेगळ्या इमोजी शेअर करत आहेत. 





Read More