Kareena Kapoor Khan: करिना कपूरने बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पुर्ण केले आहेत. तिच्या या यशानिमित्त तिचे टॉप 5 चित्रपट आणि काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
30 जून 2000 रोजी करिनाने जेपी दत्तांच्या 'रिफ्यूजी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिषेक आणि करिना या नवख्या चेहऱ्यांची छाप पाडली. विशेष म्हणजे करिनाचं हे पदार्पणच समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून चांगलं कौतुक मिळवून गेलं.
त्यानंतर गेल्या 25 वर्षांत करिनाने आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असलेले कॉमेडी चित्रपट, तर कधी गंभीर चित्रपट, दोन्ही प्रकार तिने उत्तम साकारले. करिनाचे काही निवडक चित्रपट पाहूयात ज्यांनी तिच्या करिअरला मोठं यश मिळवून दिलं.
इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात करिनाने 'गीत' नावाच्या उत्साही, बोलक्या आणि थोड्याशा खट्याळ पंजाबी मुलीची भूमिका केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि करिनाला या भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. शाहिद कपूरसोबतची तिची केमिस्ट्रीही खूप गाजली.
'चमेली' हा करिनाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. या चित्रपटात तिने एका वेश्येची भूमिका इतक्या प्रभावी पद्धतीने साकारली की समीक्षकांनी तिच्या या अभिनयाची प्रशंसा केली. यामुळे करिनाला तिच्या गोड मुलीच्या प्रतिमेपलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करता आलं.
विशाल भारद्वाज यांच्या शेक्सपियरच्या 'ओथेलो'वर आधारित या चित्रपटात करिनाने डॉली मिश्राची भूमिका साकारली. डॉली ही निरागस प्रेमिकेची भूमिका करिनाने कमालीच्या सहजतेने निभावली. या भूमिकेसाठी करिनाला राष्ट्रीय स्तरावर प्रचंड कौतुक मिळालं.
'तलाश' मध्ये आमिर खानसोबत करिनाने एका रहस्यमय भूमिका केली. तिच्या डोळ्यांतलं अनोखं गूढ या भूमिकेला अजून खास बनवत होतं. या चित्रपटातून करिनाने आपल्या अभिनयाची आणखी एक वेगळी बाजू दाखवली.
'उडता पंजाब' मध्ये करिनाने डॉक्टर प्रीत साहनी ही पंजाबमध्ये ड्रग्सच्या समस्येविरोधात लढणारी डॉक्टरची भूमिका साकारली. या गंभीर विषयातील तिच्या संयत अभिनयाची खूप प्रशंसा झाली आणि तिला अनेक पुरस्कार नामांकनं मिळाली.
'बजरंगी भाईजान', '3 इडियट्स' ,'वीरे दी वेडिंग', 'गुड न्यूज' अशा या बॉलिवूडमधील खास चित्रपटांमध्ये देखील करिनाने काम केले आहे. 25 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ती अजूनही अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. करिना लवकरच तिचे नवे चित्रपट घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आज करिनाकडे आलिशान बंगला, महागड्या गाड्या आहेत. ती तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि मुलांसह लक्झरी लाइफ जगते. ती सोशल मिडिया अकाऊंट्सवर तिच्या कौटुंबिक आणि ग्लॅमरस जगण्याची झलक सतत दाखवत असते.