कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या पुढे दिसत आहे. राज्यात भाजप कार्यालयात जल्लोष पाहायला मिळतो आहे.
सुरुवातीला भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजपने 100 चा आकडा गाठली. पुन्हा एकदा मोदींची लाट असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
भाजपचा दावा आहे की, त्यांना पूर्ण विश्वास आहे की, ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी होतील. राज्यात मतमोजणी सुरु आहे. भाजप सध्या बहुमताकडे वाटचाल करते आहे.
भाजप लिंगायत समाजाचं प्रभूत्व असलेल्या जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस वोक्कालिगा समाजाचं प्रभूत्व असलेल्या जागांवर आघाडीवर असं राजकीय विश्लेषकांच मत आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया बदामी सीट येथून पुढे आहेत तर भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येदियुरप्पा शिकारीपुरा येथून आघाडीवर आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तेसाठी 113 जागांची गरज आहे.