Kartik Aaryan drops fat Weight : अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ गेल्या काही दिवसांपासून (Chandu Champion) चर्चेत आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
चंदू चॅम्पियन सिनेमाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर कार्तिक आर्यनचा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कार्तिकने या लूकसाठी भरपूर मेहनत घेतलीये.
तुम्हाला माहिती नसेल तर, चंदू चॅम्पियनमधील लूकसाठी कार्तिकने चक्क 32 टक्के फॅट लूज केलंय. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी याची माहिती दिलीये.
या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने शरीरातील चरबी 39% वरून फक्त 7% पर्यंत कमी केली. कार्तिकने हा चॅम्पियन बनण्याचा जो प्रवास मांडला तो काही कमी प्रेरणादायी नाही, असं कबीर खानने म्हटलं आहे.
आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्याच्या शरिरात 39 टक्के चरबी होती. पण त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूची भूमिका करायची होती.
मी जेव्हा कार्तिक आर्यनला सांगितल्यावर तो हसला आणि मी करेन सर, असं त्याने आम्हाला सांगितलं अन् करून दाखवलं, असंही कबीरन खानने सांगितलं.
तो तब्बल दीड वर्षी स्टेरॉईड्स न घेता तो राहिला आणि तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता, असंही कबीर खान यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मुरलीकांत पेटकर हे भारताचा पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहे. त्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे.