Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
हिवाळी सहलीसाठी जायचा बेत आखताय? काश्मीर तुमची वाट पाहतंय...
हिवाळा म्हटलं, की भटकंतीसाठी थेट काश्मीर गाठावं असा विचार एकदातरी आपल्या मनात येऊन जातो. आणि का येऊ नये?
मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर आता काश्मीर पुन्हा बहरलं आहे. येथीवल उंचच उंच पर्वतरांगा आणि वृक्षांवर बर्फाची चादर तयार झाली आहे.
घरांचं छत म्हणू नका किंवा विस्तीर्ण मैदानं, काश्मीरमध्ये एक वेगळीच शुभ्र दुनिया सध्या अनुभवाला मिळत आहे. भारतात आता हिवाळ्याची चाहूल लागली असून, काश्मीरचं चित्रही बदलण्यास सुरुवात झाली आहे.
काश्मीरमधील सोनमर्ग येथे मंगळवारी जोरदार हिमवृष्टी झाली. तिथं गुलमर्गमध्येही असंच चित्र पाहायला मिळत होतं.
भुरभुरणाऱ्या बर्फानं पाहता पाहता रस्त्यांवरही चादर तयार केली आणि काही अंशी इथं वाहतुकीचा खोळंबा झाला. पर्यटकांनी मात्र वातावरणाच्या या सुरेख रुपाता मनसोक्त आनंद लुटला.
तुम्हीही येत्या काळात काश्मीरला जाण्याचा बेत आखणार असाल तर ही उत्तम Choice ठरेल. कारण, थंडीत काश्मीर नाही पाहिलं तर काय पाहिलं?