Kashmir Snowfall: बर्फवृष्टीमुळं काश्मीरच्या खोऱ्यातील दृश्य बदललं, पाहून म्हणाल हे सर्व कमालच आहे....
काश्मीरचा हिवाळा म्हटलं की काही गोष्टी आपोआपच डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी एक म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा बर्फ.
सध्या या प्रांतामध्ये असंच काहीसं थक्क करणारं दृश्य पाहायला मिळत आहे. कारण, काश्मीरच्या खोऱ्यासह नजीकच्या भागात तापमान बऱ्याच अंशी कमी झालं असून, थंडीचा कडाका वाढला आहे.
काश्मीरच्या गुलमर्ग, सोनमर्गमध्ये प्रचंड हिमवृष्टी झाल्यामुळं इथं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
तिथं श्रीनगर आणि मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी असल्यामुळं पर्वतांवरून येणाऱ्या शीतलहरी आणि पाऊस यामुळं इथं आलेल्या पर्यटकांना हुडहूडी भरली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी सुरुच राहणार आहे. तर, श्रीनगरमध्ये तापमान 5.3 अंशांवर असेल.
अती बर्फवृष्टीमुळं काश्मीरमधील मुघल रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ज्यामुळं श्रीनगर-सोनमर्ग- गुमरीमधील वाहतूक ठप्प आहे.
एकिकडे हिमवृष्टीमुळं काश्मीरच्या काही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असली तरीही इथं आलेल्या पर्यटकांसाठी मात्र ही परवणी ठरत आहे.
पृथ्वीच्या या नंदनवनातलं एकंदर वातावरण पाहता तुमचीही या भुरभुरणाऱ्या बर्फाचा आनंद घेण्याची इच्छा झाली ना?