Kashmir Snowfall Photos : कशाला जाताय परदेशात? स्वर्ग अवतरलंय काश्मीरात... बर्फाच्छादित काश्मीरचे फोटो पाहून म्हणाल यंदा इथं जायलाच हवं....
Kashmir Snowfall Photos : काश्मीर... पृथ्वीवरील नंदनवर, पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असणारं एक सुरेख ठिकाण.
पर्यटकांच्या यादीत बहुतेकांसाठीच अग्रस्थानी असणाऱ्या या ठिकाणचं हवंहवंसं रुप सध्या पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षाची पहिलीवहिली बर्फवृष्टी झाली आणि पाहता पाहता करड्या रंगाच्या डोंगररांगाची छटा बदलली.
दरीखोऱ्यांपासून झाडांपर्यंत सगळीकडेच शुभ्र बर्फाची चादर पाहायला मिळत आहे.
रस्त्यांपासून गल्लीबोळ असो, घरांची छतं असो किंवा अगदी जलप्रवाह असो. अगदी सगळीकडेच बर्फाची चादर पाहायला मिळत असल्यामुळं काश्मीरचं हे रुप सर्वांनाच खुणावत आहे.
काश्मीरचं हे रुप काही नवं नाही. दरवर्षी या ऋतूमध्ये काश्मीरचं हेच रुप पाहायला मिळतं. पण, प्रत्येक वेळी त्याचं नाविण्य तितक्याच प्रत्ययकारीपणे सर्वांसमोर येतं.
काश्मीरमधील गुरेज व्हॅलीपासून तिथं असणाऱ्या कैक ठिकाणांवर सध्या निसर्गानं मुक्तहस्तानं केलेली उधळण केल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात हे फोटो इतके कमाल आहेत, की काश्मीर एकदातरी पाहावं अशीच अनेकांची इच्छा होत आहे, तर काहींनी तर तिथं जाण्याचे बेतही आखण्यास सुरुवात केली आहे.
(सर्व छायाचित्र सौजन्य - x)