PHOTOS

केदार जाधवची राजकारणात एंट्री! माजी क्रिकेटरची संपत्ती आणि कार कलेक्शन पाहून डोळे फिरतील

Kedra Jadhav Networth : भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधव याने क्रिकेटनंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. केदार जाधवने भाजपात प्रवेश केला असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. तेव्हा माजी क्रिकेटर असलेल्या केदार जाधव याची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात. 

Advertisement
1/7

चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केदार जाधवला भाजपाचं सदस्यत्व दिलं. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याने मला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करायचं आहे अशी इच्छा केदारने व्यक्त केली आहे. 

2/7

केदार जाधव याने जून 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तो आयपीएल तसेच इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये कॉमेंट्री करताना सुद्धा दिसायचा. भारताकडून शेवटचा सामना केदार जाधव याने 2020 मध्ये खेळला. 

3/7

केदार जाधव याने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 2014 तर टी 20 क्रिकेटमध्ये 2016 मध्ये पदार्पण केले होते. केदारने वनडेत भारताकडून 73 सामने खेळले असून यात त्याने 1389 धावा केल्या आणि 27 विकेट सुद्धा घेतल्या. तर टी 20 मध्ये त्याने 9 सामने खेळून 122 धावा केल्या. 

4/7

2013 मध्ये दिल्ली संघाकडून केदार जाधवने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून खेळला. शेवटचा सामना केदार जाधव 2023 मध्ये आरसीबीकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला. 

5/7

माजी क्रिकेटर केदार जाधव याची एकूण संपत्ती ही 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती मिळत आहे. केदारने ही कमाई क्रिकेट, बिजनेस इन्वेस्टमेंट आणि स्पॉन्सरशिप डील्स इत्यादींमधून केली आहे. 

6/7

आयपीएलमध्ये खेळून सुद्धा केदार जाधवने कोट्यवधींची कमाई केली. आयपीएलमध्ये त्याला CSKने सर्वाधिक मानधन दिलं होतं. CSK तीन सीजनसाठी प्रति सीजन 7.8 कोटी रुपये दिले होते. 

7/7
केदार जाधव कार कलेक्शन :
केदार जाधव  कार कलेक्शन :

केदार जाधव यांच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचं कार कलेक्शन असून त्याला अनेकदा BMW X4 मॉडलची कार चालवताना स्पॉट करण्यात आले. या कारची किंमत 84 लाख रुपये असते. 





Read More