PHOTOS

Kiara Advani गुगलवर सार्वधिक का सर्च झाली? कारण वाचून व्हाल हैराण

Google year in search 2023 : 2023 या वर्षात गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये बॉलीवूड स्टार्स, क्रिकेट खेळाडू, जागतिक सेलिब्रिटी आणि बरेच लोकांची नावे यादीमध्ये आली आहेत. मात्र गुगलच्या मते कियारा अडवाणी ही 2023 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती ठरली आहे.

Advertisement
1/7

2023 हे वर्ष संपण्यासाठी काही तास उरले आहे. या सरत्या वर्षाला निरोप देताना गुगलने यावर्षीची टॉप सर्च लिस्ट जारी केली आहे. या गुगल लिस्टमध्ये बी-टाऊनची स्टायलिश अभिनेत्री कियारा अडवाणी अग्रस्थानी आहे. 

 

2/7

2023 या वर्षात कियारा अडवाणीला सर्वाधिक सर्च केले गेले. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाचाही समावेश आहे. कियाराला 2023 वर्ष लकी ठरला असून या वर्षी अनेक हिट बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं.   

3/7

7 फेब्रुवारी 2023 रोजी कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. शिवाय तिचा राजेशाही लेहेंगा आणि ज्वेलरीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. 

4/7

कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शन लूकला देखील गुगलवर सर्च केलं गेलं. अभिनेत्रीचे दागीने देखील गुगलवर सर्च केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि कियारा अडवाणी हिची चर्चा रंगली आहे.

5/7

कियाराचा लेहेंग्याची प्राईज किती? मंगळसूत्र डिझाईनची प्राईज किती?, कियाराचा वेडिंग रिसेप्शन लूक, कियाराचा एक्स नक्की कोण?, कियारा आणि सिद्धार्थचे वेडिंग फोटो यासह इतर काही गोष्टी कियाराबद्दलची माहिती मिळवण्यासाठी लोकांनी सर्च केले. 

6/7

'कॉफी विथ करण 7' च्या मंचावर कियाराने त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. 'सिद्धार्थ आणि माझी मैत्री खास मित्रापेक्षा थोडी जास्त आहे', असं कियारा म्हणाली होती. त्यानंतर त्या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली होती.

7/7

कियाराचे अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यासह तिच्या वेब सिरीजचीही चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली. ती लवकरच 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.





Read More