Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूडची ‘शेरशहा’ जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या आलिशान राजवाड्यात ही जोडी सात फेरे घेणार असून या लग्न सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत. पण याआधी सिद्धार्थ मल्होत्राचं बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनसोबत अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कोण आहेत या अभिनेत्री जाणून घेऊया...
Alia Bhatt: सिद्धार्थ मल्होत्राने स्टूडेंट ऑफ द ईअर या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे रिलेशनशीपमध्ये होते. . या दोघांनी कधीच रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं. महेश भट्ट मुळे दोघांचं ब्रेकअप झालं असं बोललं जातं.
Jacqueline Fernandez: सिद्धार्थ आणि जॅकलिन फर्नांडिसने ‘ए जेंटलमॅन’ चित्रपटात काम केले. तेव्हाच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
Tara Sutaria : अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री तारा सुतारियाने ‘मरजावां’ चित्रपटात एकत्र काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिस पर फ्लाप ठरला होता. मात्र त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
Nicole Meyer : अभिनेता सिद्धार्थचे साउथ अफ्रीकेची मॉडेल निऑल मेअरशी नवा जोडण्यात आले होते.
Kiara Advani : सिद्धार्थ आणि कियारा हे ‘शेरशाह’मध्ये एकत्र दिसले होते. त्यावेळी ते रिलेशनशीपमध्ये होते. पण त्यांनी कधीही उघडपणे नात्याची कबूली दिली नाही. आता 8 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.