Dried Lemon Benefits in Marathi: लिंबू वेळेत वापरले नाहीत तर ते सुकून जातात. त्यामुळे नंतर हे सुकलेले लिंबू फेकून देण्याची वेळ येते.
उन्हाळ्यात अनेक पदार्थांची काळजी घ्यावी लागते, अन्यथा ते खराब होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात उकाड्यामुळे अनेकांना लिंबू पाणी पाण्याची हौस होते. याच कारणास्तव अनेक घऱांमधील फ्रीजमध्ये लिंबू साठवून ठेवलेले असतात.
पण जर हे लिंबू वेळेत वापरले नाहीत तर ते सुकून जातात. त्यामुळे नंतर हे सुकलेले लिंबू फेकून देण्याची वेळ येते.
पण तुम्ही या सुकलेल्या लिंबांचाही चांगला वापर करु शकता. सोशल मीडियावर एका व्हिडीओतून यासंदर्भातील प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे.
तुमच्या घरातील सुकलेले लिंबू घ्या आणि या सुकलेल्या लिंबाच्या उभ्या फोडी कापून, या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.
त्यानंतर त्यात तीन चमचे मीठ, एक चमचा बेकींग पावडर, दोन चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे डिटर्जंट पावडर टाका.
हे सर्व मिक्सरमध्ये नीट बारीक करून घ्या आणि ही तयार केलेली बारीक पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या.
या पेस्टचा वापर तुम्ही भांडी घासण्यासाठी करु शकता. एल्युमिनियम, पितळ, तांब्याचे भांडे तुम्ही या पेस्टनी घासू शकता.
या पेस्टमुळे तुम्ही उगाच जोर न लावता सहजपणे भांड्यांचा चिकटपणा घालवू शकता. ही पेस्ट एकापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू शकतो आणि वापरू शकतो.