घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात.
किचन सिंक हा रोजचा वापरातली वस्तू आहे. दररोज भांडी व खरकट्या भांड्यामुळं सिंक चिकट व अस्वच्छ होते. हा चिकटपणा लवकर जातदेखील नाही.
किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशावेळी एक चमचा तांदुळ वापरुन तुम्ही काही मिनिटांत सिंक स्वच्छ करु शकाल.
एक छोटा चमचा तांदुळ घ्या आणि किचन सिंकमध्ये पसरवा.
त्यानंतर एक छोटा स्ब्रकर घेऊन त्यावर थोड डिटर्जंट घेऊन सिंकमध्ये पसरवलेले तांदळाने सिंक घासून घ्या
सिंक चांगला स्वच्छ केल्यानंतर त्यावर पाणी टाकून स्वच्छ करुन घ्या.
तांदळामुळं सिंकमध्ये साचलेला तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. तांदूळ स्क्रब म्हणून काम करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)