Kia EV6 car Features and Price: तुम्हालाही किया या ब्रॅन्डची (Kia Car Collection 2023) कार खरेदी करायची आहे? मग वाट कसली पाहतायत. या कारचे लवकरच बुकिंग (Booking) सुरू होणार आहे. तेव्हा या कारची किंमत आणि बुकींग डिटेल्स (Kia Car Collection) त्यातसोबत फिचर्स जाणून घ्या एका क्लिकवर!
कारप्रेमींची प्रतिक्षा आता संपली आहे. 2023 मध्ये किया इव्हि6 या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ही लॉन्च झाल्यापासून गेल्या सात महिन्यात सर्वाधिक विकली गेलेली कार आहे.
या कारमध्ये रनवे रेड, यॉट ब्लू, अरोरा ब्लॅक पर्ल, स्नो व्हाईट पर्ल असे रंग आहेत.
या कारची बॅटरी खूप आकर्षक आहे. ही 708 किमी पर्यंतचा मायलेज देते. यात 77.4 kWh बॅटरी पॅक आहे.
यामध्ये 50 kW DC फास्ट चार्जर सपोर्ट आहे जो 1 तास 13 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होतो. 36 तासात 0 ते 100 टक्के चार्जिंग होते.
यामध्ये दोन कार्स आहेत. एक म्हणजे GT Line आणि दुसरी GT Line AWD. या दोन्ही कार्सची किंमत ही अनुक्रमे 60.95 लाख आणि 65.95 लाख इतकी आहे.
सर्व छाया - झी न्यूज
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)