Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते तसेच सर्दी आणि खोकला - कफ लवकर होतो. अशावेळी संत्र्याचा ज्यूस तुम्ही सकाळच्या नाश्त्यात पिऊ शकता. संत्र्याचा ज्यूस हा हलका गोड आणि आंबट असतो. याचे सेवन सकाळच्या नाश्त्यात केल्यामुळे फ्रेशनेस मिळतो.
तुम्ही वेळीअवेळी संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास पोटात गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा संत्र खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणत्या वेळी त्याचे सेवन केल्याने शरीराला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील, याबाबत जाणून घेऊयात.
संत्र हे कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये. प्रयत्न करा की संत्र्याच सेवन दुपारच्यावेळी करावे. रिकाम्यापोटी संत्र खाल्ल्याने एसिड रिफ्लॅक्स होते ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढते त्यासोबतच गॅसची समस्या देखील निर्माण होते.
संत्र्याचे सेवन केल्याने त्वचेला अनेक लाभ मिळतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि पोट देखील चांगले राहते.
एक आठवडा हिवाळ्यात संत्र्याचं सेवन केल्याने त्याचे फायदे दिसू लागतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. तसेच संत्री खाल्ल्याने डोळ्यांना देखील फायदे मिळतात.
संत्र आरोग्यासाठी चांगलं असतं मात्र यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनासंबंधित आजार उद्भवतात. सोबतच साइट्रस एलर्जी किंवा किडनी संदर्भातील आजार होऊ शकतात.
किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी संत्र खाऊ नयेत. संत्र्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. लिंबूवर्गीय फळांची ऍलर्जी असलेल्या लोकांनी संत्रीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)