अर्पिता खान (arpita khan) ही सलमान खानची सर्वात लाडकी असून, सलमान (salman khan) अक्षरशः तिच्यावर जीव ओवाळून टाकतो, पण तुम्हाला माहित आहे का ? सलमान खानची ही लाडकी बहीण अर्पिता रस्त्यावरून थेट खान कुटुंबाची लेक कशी झाली होती ? त्या सकाळी नेमकं काय झालं होतं ? चला जाणून घेऊया.
अर्पिता खान (salman khan sister arpita khan) सलमान खानची लाडकी बहीण आहे. सलीम खान आणि हेलन यांची ती दत्तक मुलगी आहे.
एकदा सलीम खान आणि हेलन (salim khan, helan) गाडीतून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक मुलगी रडताना दिसली.
तिला रडताना पाहून दोघानांही फार वाईट वाटलं. ती अनाथ असल्याचं कळताच दोघांनीही तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
सलमान खान आणि इतर भावंडं अर्पितावर जीव ओवाळून टाकतात. ती घरात सर्वात लहान आहे आणि सर्वांची लाडकी आहे.
अर्पिताने आयुष शर्मासोबत (aayush sharma) लग्न केलं असून तिला दोन लहान क्युट मुलंसुद्धा आहेत.