Top 10 Most Powerful Women: स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा सध्या बहुतांश स्तरांवर स्वीकारण्यात आला असून, आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संधीचं महिलांनी सोनं केलं आहे.
या यादीत मानाचं असं पहिलं स्थान मिळालं आहे उर्सुला वॉन डेर लेयेन यांना. युरोपियन युनियनच्या युरोपियन कमिशन अध्यक्षपदी असणाऱ्या लेयेन यांनी गॉटिंगेन युनिवर्सिटी आणि मुंस्टर युनिवर्सिटीतून अर्थशास्त्राचं पदवी शिक्षण घेतलं आहे.
शक्तिशाली महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थानी नाव आहे क्रिस्टीन लेगार्ड यांचं. युरोपीयन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या लेगार्ड यांनी Institut d'Etudes Politiques मधून पॉलिटीकल सायन्सचं शिक्षण घेतलं आहे.
अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या यादीत तिसऱ्या स्थानी असणारं नाव आहे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं. त्यांनी कोणतंही महाविद्यालयीन पदवी शिक्षण घेतलेलं नसलं तरीही त्यांनी लिंग्विस्टिक डिप्लोमा केला आहे.
क्लाउडिया शीनबाम या मेक्सिकोच्या पंतप्रधानपदी विराजमान असून, त्यांनी Universidad Nacional Autonoma de Mexico भौतिकशास्त्राची स्नातक पदवी घेतली आहे.
यादीत पाचव्या स्थानी असणाऱ्या मेरी बारा जनरल मोटर्सच्या सीईओपदी असून, मिशिगनच्या केटरिंग युनिवर्सिटीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे.
अमेरिकेतील फिडेलिटी इन्वेस्टमेंट्सच्या सीईओ अबिगेल जॉनसन या यादीत सहाव्या स्थानी असून, त्यांनी होबार्ड एंड विलियम स्मिथ महाविद्यालयातून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि हार्वर्ड युनिवर्सिटी बिजनेस स्कूलमधून एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
फोर्ब्सच्या यादीत सातवं स्थान ज्युली स्वीट यांना मिळालं असून, कॅलिफोर्नियातील क्लेरमोंट मॅककेना कॉलेज आणि कोलंबिया युनिवर्सिटी लॉ स्कूलमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय.
बिल गेट्स यांच्या एक्स वाईफ मेलिंडा फ्रेंच यांना यादीत आठवं स्थान मिळालं असून, त्यांनी ड्यूक युनिवर्सिटीतून कंप्यूटर साइंसचं शिक्षण घेतलं आहे, इथंच त्यांनी अर्थशास्त्रातील पदवी शिक्षणही घेतलं.
अॅमेझॉनचे संस्थापक जेप बेजोस यांच्या एक्सवाईफ मॅकेंजी स्कॉट यांचंही या यादीत नाव असून, त्या नवव्या स्थानी आहेत. त्यांनी न्यू जर्सीतील प्रिंसटन युनिवर्सिटीतून इंग्रजी विषयात पदवी शिक्षण घेतलं आहे.
जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत दहावं स्थान आहे जेन फ्रेजर यांचं. सिटी ग्रुपच्या सीईओपदी असणाऱ्या फ्रेजर यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतलं असून, हार्वर्ड बिजनेस स्कूल येथून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.