`बिग बॉस 1`चा विजेता राहुल रॉय सिनेक्षेत्रापासून दूर गेला आहे. रोहितच्या मते बिग बॉसच्या माध्यमातून मिळालेल्या ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा तो पुरेसा फायदा उचलू शकला नाही.
`बिग बॉस 2`चा विजेता आशुतोष कौशिक टीवी आणि सिनेमापासून दूर ग़ेला आहे. सध्या आशुतोष 5 ढाब्यांचा व्यवसाय सांभाळत आहे.
`बिग बॉस 3` चा विजेता विंदू दारा सिंह अनेक ठिकाणी काम करत आहे. महाबळेश्वरमध्ये चिल्ड्रन कॅपिंग, मुंबईमध्ये ब्यूटी सलून आणि पंजाबी सिनेमांमध्ये काम करत आहे.
`बिग बॉस 4` ची विजेती श्वेता तिवारी ही हिंदी मालिकांंमधून रसिकांच्या भेटीला आली. `कसौटी जिंदगी की`मधून श्वेता तिवारी पुन्हा नावारूपास आली. त्यानंतर श्वेताने टीवी सीरियल `बेगुसराय` मध्ये काम केले.
`बिग बॉस 5` ची विजेती जूही परमार पौराणिक मालिका`शनि`मध्ये व्यस्त आहे. बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वी ती `कुमकुम`या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती.
`बिग बॉस 6`ची विजेती उर्वशी ढोलकिया हिंदी मालिका `चंद्रकांता` मध्ये राणी इरावतीची भूमिका साकारत आहे.
`बिग बॉस 7`ची विजेती गौहर खान बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. `बेगम जान`, `बद्रीनाथ की दुल्हनिया`, `फीवर` चित्रपटामध्ये ती झळकली आहे.
'बिग बॉस 8'चा विजेता गौतम गुलाटी अभिनय क्षेत्रात आहे. `अजहर`,`बहन होगी तेरी` या चित्रपटामध्ये तो झळकला आहे.
बिग बॉस 9 चा विजेता प्रिंस नरूला `बड़ो बहु` आणि `रोडीज` या कार्यक्रमामध्ये जज झाला आहे. यापूर्वी दोन गाणीदेखील प्रिंसने गायली आहेत. लवकरच तो पंजाबी चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'बिग बॉस10'चा विजेता मनवीर गुर्जरला विजेतेपदानंतर अॅंकरिंगच्या अनेक ऑफर आल्या मात्र त्याला बॉलिवूडमध्ये करियर करायचं आहे.