कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढरा का असतो? याचे कारण तुम्हाला माहिती का? वाचा सविस्तर
देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस दलाचा गणवेश खाकी रंगाचा असतो. मात्र, कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग हा पांढरा आहे.
भारतातील इतर राज्यांमधील पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असला तरी कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग हा पांढरा आहे.
1845 मध्ये ब्रिटिशांनी कोलकाता पोलिसांची स्थापना केली होती. त्याच वेळी त्यांनी पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढरा ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
किनारी भाग असल्याने तेथील आर्द्रता थोडी जास्त आहे. त्यामुळे गणवेशाचा रंग पांढरा ठेवण्यात आला आहे. वास्तविक, पांढरा रंग सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेचा प्रभाव कमी करतो.
पश्चिम बंगालचे राज्य पोलीस हे तपकिरी रंगाचा गणवेश घालतात. तर कोलकाता पोलीस पांढरा रंगाचा गणवेश घालतात.
1847 मध्ये सर्व पोलिस कर्मचारी पांढरा गणवेश घालतील असा आदेश आला होता. यामुळेच कोलकाता पोलिस पांढऱ्या गणवेशामध्ये आपली सेवा देतात.