महिला दिनानिमित्त कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने बाय वन गेट वनची ऑफर दिलीय. ज्यामध्ये तुम्हाला 99,999 रुपयांमध्ये दोन स्कूटर मिळणार आहेत.
आतापर्यंत तुम्ही कपडे किंवा इतर गोष्टींवर बाय वन गेट वनच्या ऑफर बघितल्या असतील. परंतु, आता इलेक्ट्रिक स्कूटरवर देखील अशीच ऑफर मिळत आहे.
कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरने मंगळवारी त्यांच्या नवीन X3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलीय. जिची किंमत 52,999 रुपयांपासून सुरु होते.
कंपनीने ही ऑफर महिला दिनानिमित्त ठेवली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 99,999 रुपयांमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे.
यामध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रिक स्कूटर, दोन रजिस्ट्रेशन आणि दोन चार्जर देण्यात येतील. तर एक स्कूटर घेतल्यावर तुम्हाला एक यूनिट मिळेल. ज्याची किंमत 52,999 रुपये आहे.
कंपनीची ही ऑफर 1 एप्रिल 2025 पर्यंत राहणार आहे. तुम्ही वेबसाइटवर 799 मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्विक चार्जिंग क्षमता असणारी बॅटरी देण्यात आलीय. त्यासोबतच डिजिटल डॅशबोर्ड आणि अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3000 वॉटची बॅटरी देण्यात आलीय. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 75 ते 100 किमी अंतर पार करते. ही स्कूटर महिला आणि पुरुषांसाठी खास आहे.