PHOTOS

कृति सेनने समुद्रकिनारी 'या' खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत दाखवली झलक

Kriti Sanon Birthday Celebration Photos: 35 वर्षांची झाली अभिनेत्री. समुद्रकिनारी या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस. फोटो शेअर करत दाखवली झलक. 

Advertisement
1/8

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कृति सेननने नुकताच तिचा 35वा वाढदिवस 28 जुलै रोजी खास पद्धतीने साजरा केला. शहरांपासून दूर, समुद्राच्या सान्निध्यात तिने वाढदिवस साजरा करत काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

2/8

या फोटोमध्ये तिची बहिण नुपूर सेननही तिच्यासोबत दिसून येते आहे. कृति सेननने वाढदिवसाच्या दिवशी ब्लॅक आणि ग्रीन शेडच्या क्रॉप टॉपसोबत मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता. 

3/8

या लुकमध्ये ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती. फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. तिच्या या हटके पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

4/8

वाढदिवस साजरा करताना कृति सेनन बोटवर व्यायाम करताना दिसली. समुद्राच्या मधोमध बोटिंगचा मनमुराद आनंद घेतानाचे काही क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले.

5/8

काही फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये देखील झळकत आहे. ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. कृति आणि बहिण नुपूर या दोघींमधील बहिणींची बॉन्डिंग फोटोमध्ये सहज जाणवते. 

6/8

नुपूरने कृतिला किस करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्या दोघींचा हा खास क्षण चाहत्यांच्या मनात घर करून गेला.सध्या दोघींचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

7/8

कृति सेनन लवकरच 'तेरे इश्क में' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती साउथ सुपरस्टार धनुषसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

8/8

कृति सेननने समुद्रकिनारी साजरा केलेला वाढदिवस तिच्या चाहत्यांसाठी एक खास आकर्षण ठरला आहे. 





Read More