PHOTOS

रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!

Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. 

Advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. तिच्या सुंदर फोटोमध्ये इंटरनेटवर खळबळ माजलीय. त्यासोबत राशाचं नाव क्रिकेटपटूशी जोडलं जातंय. एका चाहत्याने पोस्टवर विचारलंय की, तू एखाद्या क्रिकेटरला डेट करतेय का?

2/7

यामागे कारण ठरलं ते टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादव याने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील राशाचे काही फोटो लाइक केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. कुलदीपने राशा, तमन्ना आणि तिच्या इतर मित्रांसोबतच्या फोटोंवर लाइकमुळे अफवा वाऱ्यासारखी पसरलीय. कुलदीप राशालाही इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. इंस्टाग्रामवर राशाचे आधीपासूनच 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

3/7

राशा थडानी 19 वर्षांची असून तिने बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटीसोबतचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. कुलदीप यादवने हे फोटो लाइक केल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता आहे. 

4/7

राशा लवकरच आझाद या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार अजय देवगण आणि त्याचा पुतण्या अमन देवगण खास भूमिकेत आहेत. डायना पेंटीशिवाय अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात मोहित मलिक आणि पियुष मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.

5/7

दरम्यान कुलदीप किंवा राशा दोघांनीही डेटिंगच्या अफवांवर काहीही भाष्य केलं नाही. अशा स्थितीत चाहत्यांनी लावलेले अंदाज ही निव्वळ अफवादेखील असू शकते. 

6/7

16 मार्च 2005 रोजी जन्मलेल्या राशाने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिचं 12 वी पूर्ण केलंय. कोरियन मार्शल आर्ट तायक्वांदोमध्येही ती ब्लॅक बेल्ट आहे.

7/7

तर कुलदीप यादव सध्या दुखापतीतून सावरत असताना तो नुकताच जर्मनीहून परतलाय. लवकरच तो तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त करणात आलीय. 





Read More